• Mon. Nov 25th, 2024

    पोलीसभरती परीक्षेतील संशयितांचा SRPFच्या परीक्षेतही गैरप्रकार; पुणे, सोलापुरातून ७ जणांना अटक

    पोलीसभरती परीक्षेतील संशयितांचा SRPFच्या परीक्षेतही गैरप्रकार; पुणे, सोलापुरातून ७ जणांना अटक

    मुंबई : राज्य राखीव पोलिस दलाच्या भरती परीक्षेवेळी कॉपी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केलेले आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्यांपैकी सुमारे ४२ उमेदवार पुन्हा रविवारी राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेला बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी मुंबई पोलिसांनी पुणे आणि सोलापूर येथून सहा जणांना तर पुण्याच्या सिंहगड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

    Ganpati Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेकडून महत्त्वाची घोषणा
    चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करण्याचा प्रकार मुंबई पोलिसांनी मे महिन्यात उघडकीस आणला होता. त्या वेळी ३९ जणांची धरपकड केली आणि ११४ संशयांविरुद्ध पोलिसांना पुरावे सापडले होते. या कॉपी प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर शासकीय पदांसाठी होणाऱ्या कॉपीच्या प्रकारांना आळा बसेल असे वाटत होते; पण झालेच उलटेच. त्यांचा हा धीटपणा पाहून पोलिसही अवाक झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साह्याने हे उमेदवार कॉपी करीत असल्याचे मे महिन्यातील परीक्षेवेळी आढळले होते.
    मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडप उभारण्यासाठी एका झटक्यात सर्व परवानग्या कशा मिळवाल?
    राज्य राखीव पोलिस दलातील शिपाई पदासाठी रविवारी २३ जुलै रोजी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस भरतीप्रमाणे शासकीय पदांच्या सर्वच लेखी परीक्षांमध्ये अशाप्रकारे कॉपी केली जात असल्याने पोलिसांनी या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. दहिसर पोलिसांनी ११४ संशयित आरोपींच्या यादीत असलेल्या पाच जणांना पुणे येथून परीक्षेदरम्यान पकडले. तर गोरेगाव पोलिसांनी सोलापुरातून एकाला अटक केली. संशयितांच्या यादीत असलेल्या आणि पुन्हा परीक्षेला बसलेल्या इतरांचीही धरपकड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    विरोधी पक्षनेत्याने बोलायचं नाही तर बोलायचं कुणी?; नीलम गोऱ्हेंनी टोकलं, अंबादास दानवे भडकले

    पुन्हा तेच कॉपी किट

    पुणे येथील सिंहगड पोलिसांनी वेगवेगळ्या केंद्रावरून कॉपी केल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली. या चौघांपैकी योगेश जाधव या आरोपीला भांडुप पोलिसांनीदेखील कॉपी प्रकरणात अटक केली होती. आठ दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. कॉपी करताना पुन्हा पकडल्यानंतर त्याच्याकडे चिनी किट पुन्हा सापडले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed