• Wed. Mar 11th, 2026

    मजूर महिलेसोबत मालकाचं धक्कादायक कृत्य, कुटुंब संपवण्याची धमकी अखेर पापाचा घडा भरला अन्…

    मजूर महिलेसोबत मालकाचं धक्कादायक कृत्य, कुटुंब संपवण्याची धमकी अखेर पापाचा घडा भरला अन्…

    पालघर: डहाणू शहरातील मसोली जवळील चिकूच्या वाडीत मजूर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात आरोपी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

    पालघर जिल्ह्यातील डहाणू, घोलवड, बोर्डी परिसरात असंख्य चिकूच्या वाड्या म्हणजेच बागायती आहेत. पीडित महिला मोलमजुरी करणारी असून ती आपल्या कुटुंबातील काही महिलांसह आरोपीच्या वाडीत चिकू तोडण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी जात असे. एक दिवस महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी मालकाने या महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला दमदाटी करत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

    आरोपी पीडित महिलेवर तो अत्याचार करत राहिला. आरोपी मालकाचे अत्याचार असहाय्य झाल्याने पीडित महिलेने डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेतली. डहाणू पोलिसांना पीडित महिलेने आपल्या सोबत झालेल्या घटनेची संपूर्ण आपबीती सांगितली. त्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात ३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी मालकाला डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.
    जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतात उतरून लावणी, नंतर ट्रॅक्टर चालवत…

    पीडित महिलेचं कुटुंब भीतीच्या सावटाखाली

    आरोपीनं दबाव टाकल्यानं संबंधित पीडित महिलेचं कुटुंब भीतीच्या सावटाखाली होतं. संबंधित महिलेला इतरत्र कुठं या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी देखील आरोपीनं दिली होती. पीडित महिलेनं या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्तीला माहिती सांगितल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्तीनं समुपदेशन केल्यावर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
    भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच जोरदार पावसाचे आगमन, जाणून घ्या कधी सुरु होणार मॅच…
    दरम्यान, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पालघर पोलीस आरोपीवर कठोर कारवाई करतात का हे पाहावं लागेल. पालघर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील अधिक तपशील चौकशीअंती समोर येईल. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

    Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी अंगलट, अजित पवार संतापले, समर्थक नेत्यांची खरडपट्टी, सूत्रांची माहिती

    ना बसायची व्यवस्था ना डोक्यावर छप्पर, शिंदे-फडणवीसांच्या कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांना उन्हात बसवलं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed