• Mon. Nov 25th, 2024
    मोबाईलचे नेटवर्क डाऊन; प्रवेश देताना अडचण, रहिवाशाला राग अनावर, सिक्युरिटीला बेदम मारहाण

    नवी मुंबई: हल्लीच्या काळात क्षुल्लक कारणांवरून राग डोक्यात धरून वादविवाद झालेले पाहायला मिळतात. त्यात रागाच्या भरात नको त्या गोष्टी घडतात. नंतर मनस्ताप करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबई शहरामध्ये क्षुल्लक कारणांवरून अनेक वादविवाद होऊन एकमेकांच्या हत्या केल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. काही वेळा रागाच्या भरात समोरील व्यक्तींला बेदम मारहाण केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अशीच पुन्हा नवी मुंबई मधील खारघर सेक्टर १३ मध्ये युवकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    क्षुल्लक कारणावरून युवक आणि सुरक्षारक्षकामध्ये वादविवाद होऊन बेदम मारहाण केल्याचे दृश्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कैद व्हिडीओमध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे, सुरक्षरक्षकाने मोबाईलमध्ये एंट्री न केल्याचे कारण असून हाच राग डोक्यात धरून सुरक्षा रक्षकाला हाताने चापटी मारून बेदम मारहाण केली आहे. खारघर येथील पार्थ सोसायटी (बिल्डींग नं २२८ सेक्टर १३ खारघर) या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाला सोसायटीमध्ये आलेल्या एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली.

    सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

    याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पार्थ सोसायटीमध्ये एका व्यक्तीला भेटण्यासाठी एक इसम आला होता. त्या इसमाची सुरक्षा रक्षकाने रजिस्ट्रेशनवर पूर्ण माहिती भरली पण सोसायटीच्या मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलमध्ये त्या इसमाची माहिती भरण्यात आली नाही. त्याचा राग सोसायटीतील राहिवाशाला आल्याने त्याने सदर इसमास माझ्या घरी का सोडले नाही या गोष्टीचा जाब विचारत सुरक्षा रक्षकाला हाताने मारहाण केली. या मारहानीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खारघर मध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Pune Crime : आई अन् दोन मुलं झोपेत होती, ACPने पत्नीसह पुतण्यावर गोळी झाडली; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed