• Mon. Nov 25th, 2024

    टोलनाक्यावर तुम्हाला का अडवलं? मनसैनिकांनी टोलनाका का फोडला? अमित ठाकरेंनी किस्सा सांगितला

    टोलनाक्यावर तुम्हाला का अडवलं? मनसैनिकांनी टोलनाका का फोडला? अमित ठाकरेंनी किस्सा सांगितला

    शिर्डी : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी टोलनाक्यावर नेमकं काय घडलं, मनसैनिकांनी टोलनाका का फोडला? याचंही कथन केलं.

    समृद्धी महामार्गावरील नाशिकच्या सिन्नरजवळील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे राग अनावर झाल्याने मनसैनिक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली.

    अजित पवार मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादी-भाजपचं काय ठरलंय? तटकरेंनी सगळंच सांगितलं!
    अमित ठाकरे काय म्हणाले?

    रात्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी तिकडे जायला निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीला थांबायला सांगितलं. कोपरगाववरून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टटॅग असतानाही तो रॉड खाली आला.

    तो टोल नाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकार्याने त्यांना फास्टटॅग सुरु नाहीत का? असं विचारलं. त्यावर त्यांनी आमचे काही इश्श्यूज आहेत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. टोल नाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. आम्ही मॅनेजरला फोन केला तेव्हा तो सुद्धा तश्याच भाषेत बोलत होता. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं. मी नाशिकला पोहोचल्यानंतर कोणीतरी टोल फोडला हे मला तिथे कळालं. साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे त्यात अजून एकाची भर पडली, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली.

    एका दादांच्या एन्ट्रीने दुसऱ्या दादांचं विधानसभेचं गणित सोपं, भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला पालवी फुटली!
    वेळ देऊनही थांबले नाहीत, आम्ही राजीनामे देतो, मनसैनिक चिडले

    चार दिवस तयारी करून वाट पाहिल्यानंतरही मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे फक्त २० सेकंद थांबले म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आपल्याच फलकावर राग व्यक्त केला. ही घटना नगर जिल्ह्यातील राहाता येथे घडली आहे. अमित ठाकरे यांनी ठरवूनही वेळ दिला नाही म्हणून चिडलेल्या कार्यकर्त्यांनी थेट राजीनामे देण्याची तयारीही दर्शविली आहे. शनिशिंगणापूर दर्शन घेतल्यावर रात्री उशीरा ते पुढील प्रवासाला निघाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed