• Sat. Sep 21st, 2024
पाच वर्षांनी गुरूजींची बदली, बर्थडेदिवशीच निरोप समारंभ, विद्यार्थी हमसून हमसून रडले

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक सुहास जयराम उरवणे यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर निरोप समारंभावेळी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.लाडक्या गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. सुहास उरवणे गुरुजींचा पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांसोबत असलेला ऋणानुबंध प्रत्यक्षात समोर आला.

गुरुजींकडून याबाबत अधिक माहिती घेतली असता, पाच वर्षे निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत काम केले आहे मात्र, शासनाच्या अधीन असल्याने बदली हा अविभाज्य घटक आहे. आता अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली आहे. १०२८ ते २०२३ या कालावधीमध्ये निमगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत होतो. बदली झाली आता जावेच लागेल, अशी समजूत काढत विद्यार्थ्यांना निरोप दिला. पाच वर्षांमध्ये निमगाव मधील सर्व विद्यार्थ्यांसोबत लळा लागला होता असे गुरुजींनी बोलताना सांगितले. तीस वर्षांच्या कार्यकाळात अशा प्रसंगाला जड अंतकरणाने निरोप दिला.

सोलापूर जिल्हा न्यायाधीशांची सेवानिवृत्ती; फुलांचा वर्षाव करत दिला निरोप

गुरुजींची बदली अकलूजला:

सुहास उरवणे गुरुजी २०२८ साली निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले होते. पाच वर्षांनंतर त्यांची निमगाव मधून अकलूज येथील पंचवटी या ठिकाणी बदली झाली .पाच वर्षांमध्ये निमगावची शाळा अतिशय प्रगतीपथावर आली. एखाद्या इंग्रजी शाळेला लाजवेल अशी निमगावची जिल्हा परिषद शाळा उभी झाली आहे. शाळेमध्ये गेल्या पाच वर्षात लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फायदा करण्यात गुरुजींचा मोठा वाटा राहिला आहे.

विद्यार्थ्यांना वह्या,कंपास, स्कूल बॅग, बुट -सॉक्स, टाय, बेल्ट,टी शर्ट,सायकल बँक यासारखे अनेक उपक्रम त्यांनी शाळेमध्ये राबवले होते. शाळेचे आणि गावाचे नाव जिल्ह्यात, राज्यात व देशपातळीपर्यंत पोहोचवले. आपल्या कार्याच्या माध्यमातून शाळेला पुरस्कारही मिळवून दिले. मात्र, आता पाच वर्षानंतर गुरुजींची बदली अकलूज येथील पंचवटी जिल्हा परिषद शाळेत झाली आहे.

निमगाव शाळेतून निरोप देताना विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला:
सुहास उरवणे गुरुजींची नुकतीच निमगाव जिल्हा परिषद शाळेतून बदली झाल्याने लाडक्या गुरुजींना निरोप द्यायचा होता म्हणून विद्यार्थ्यांनी २२ जुलै ही तारीख ठरवली,कारण या दिवशी गुरुजींचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून उरवणे गुरुजींचा निरोप समारंभ पार पडला. निमगाव शाळेतून निरोप घेताना शाळेतील सर्व मुलांनी हंबरडा फोडला. विद्यार्थी रडताना पाहून गुरुजी देखील अश्रू रोखू शकले नाही.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed