• Wed. Sep 16th, 2026

इरशाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

ByMH LIVE NEWS

Jul 20, 2023
इरशाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

मुंबई, दि.२०: खालापूर जवळील इरशाळवाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावेत आणि या दुर्घटनेतील आणखी काही जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.  दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. घटनासस्थळी सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.

यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी,  पनवेलचे नायब तहसीलदार श्री. लाचके उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed