• Sat. Sep 21st, 2024

जुन्या भांडणाचा वचपा काढला, चहाच्या टपरीवर टोळक्याने दोघांना गाठलं, डोक्याच्या मधोमध कोयत्याचा वार अन्…

जुन्या भांडणाचा वचपा काढला, चहाच्या टपरीवर टोळक्याने दोघांना गाठलं, डोक्याच्या मधोमध कोयत्याचा वार अन्…

बारामती: जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील टी. सी. कॉलेजजवळील टी. कॉर्नरनजीक ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच तरुणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
काळ आला पण वेळ..! उपवन तलावात दोन तरुण बुडत होते, टीडीआरएफ जवानांनी पाहता क्षणी…
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश धुळाबापू वाघमोडे (रा. जळोची, बारामती), ओंकार सतीश सोनवणे (रा. उर्जा भवनसमोर, एकतानगर, बारामती), श्रीनाथ संतोष शिंदे (रा. रूई, बारामती), गौरव संतोष सुळ (रा. जळोची, बारामती) व पृथ्वीराज (रा. जळोची) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सूर्यनगरीत राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने याबाबत फिर्याद दिली आहे. हा विद्यार्थी मूळचा कर्जत तालुक्यातील राहणारा असून तो सध्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेत आहे. दि. १६ जुलै रोजी फिर्यादी हा घरी असताना त्याला मित्राचा फोन आला. त्याने टी. सी. कॉलेजजवळ दुचाकी पंक्चर झाली असल्याचे सांगितले.

सात मुलांसह दुचाकीवरुन प्रवास, ताडदेव पोलिसांकडून गुन्हा दाखल

त्यानुसार फिर्यादी तेथे गेला. पंक्चर काढल्यानंतर ते दुचाकीवरून जात टी कॉर्नरजवळ थांबले. तेथे प्रगतीनगर बाजूकडून दोन दुचाकी आल्या. या दोन दुचाकीवरून पाचजण उचरले. त्यापैकी गणेश वाघमोडे व ओंकार सोनवणे यांनी सॅकमध्ये ठेवलेला कोयता काढला. तो फिर्यादीच्या डोक्यात मध्यभागी मारला. फिर्यादी खाली कोसळल्यानंतर पुन्हा दोनदा कोयता मारण्यात आला. तो त्याच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ लागला. रक्ताच्या थारोळ्यात फिर्यादी पडला होता. अन्य तरुणांनी वाघमोडे आणि सोनवणे यांच्याकडे पाहत मोठमोठ्याने ओरडून याला जिवंत सोडू नका, असे सांगितले. फिर्यादीने मित्रासह तेथून कसाबसा पळ काढत एका झाडीचा आसरा घेतला. तेथून पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed