• Sat. Sep 21st, 2024

पावसाची बॅटिंग झाली, दहावी बारावीसह मुंबई विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर पडली, कारण

पावसाची बॅटिंग झाली, दहावी बारावीसह मुंबई विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर पडली, कारण

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावीची पुरवणी परीक्षेत गुरुवार २० जुलै रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने २० जुलैचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट पुरवणी परीक्षांना १८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. राज्यात बारावीला सत्तर हजार तर दहावी पुरवणी परीक्षेसाठी ४९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून दहावीला ५ हजार २१२ तर बारावीसाठी ४ हजार ४३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुरवणी परीक्षेत गुरुवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाने सायंकाळी हा निर्णय घेतला. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्यात काही जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाणे अडचणीचे ठरू शकते, याबाबींचा विचार करत उद्याचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते.
Naresh Goyal : जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून नवा गुन्हा दाखल, आठ ठिकाणी छापे
विभागीय मंडळ कार्यालयांना राज्य मंडळाकडून मॅसेजद्वारे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आल्याचे सांगण्यात येते. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, २० जुलैचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून दहावीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर २ ऑगस्ट तर बारावीचा पेपर ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट; IMDकडून दिल्या जाणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ तरी काय? जाणून घ्या सोप्या शब्दात
मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या ( २० जुलै) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार व रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या ( २० जुलै २०२३ ) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असं मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितलं.

Maharashtra Rains: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed