पोलादपूर : रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले असून मुसळधार पावसाचा फटका पोलादपूर तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यात एका ठिकाणी दरड कोसळल्याचे वृत्त असून त्या ठिकाणी बचाव पथक पोहोचले आहे. पोलादपूर तालुक्यातील वाकण मंडळ नाणेघोळ येथे ही दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार यात नागरिकांना कोणतीही इजा झालेली नाही. तर चार घरांचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी मोबाईल रेंज नाही. पुढील माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी पोलिस व यंत्रणा पोहोचत आहे. या सगळ्या विषयात रायगड जिल्हाधिकारी थोड्याच वेळात अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोल्हापूर शहर परिसरातील दुसऱ्या एका घटनेत पोलादपूर तालुका येथे पोलादपूर शहर प्रभात नगर पश्चिम येथे अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणची ड्रेनेज पाईपलाईन जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली आहे. परिणामी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुदैवाने स्थलांतरित करावे लागले नाही. या घटनांनी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकारावर महाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनपुरे व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे हे लक्ष ठेऊन आहेत.