सीएसटीमटी ते अंबरनाथ आणि बदलापूर ते कर्जत मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मात्र अंबरनाथ – बदलापूर अप-डाउन मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्वत बंद आहे.
दरम्यान, बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थितीची शक्यता आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी १६.३० इतकी झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली, सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशामक दल सज्ज असल्याचं माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकणी पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसाचा परिमाण रेल्वे सेवेवरही झालेला आहे. नवी मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून सतत पाऊस सुरू आहे.
अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. पावसामुळे हार्बर मार्गावरील आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेची सेवा १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्लँटफॉर्मवर रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणत गर्दी झाली आहे. कामावर जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांना रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे कार्यालयात पोहचण्यास उशीर होत आहे.