• Sat. Sep 21st, 2024

दूध द्यायला गेला अन् गायब झाला, ११ तासांनी लिफ्टखाली मृतदेह; ठाण्यात दूधवाल्याचा संशयास्पद मृत्यू

दूध द्यायला गेला अन् गायब झाला, ११ तासांनी लिफ्टखाली मृतदेह; ठाण्यात दूधवाल्याचा संशयास्पद मृत्यू

ठाणे: ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका दूधवाल्याचा लिफ्ट खाली अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. घरच्यांनी शोध घेतल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा दूधवाला लिफ्टच्या खाली मिळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सदरच्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

ठाण्यातील मुंब्रा परिसरात अलमास कॉलनी येथील अनमोल एमराल्ड इमारतीच्या लिफ्ट खाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांना फोन केला असता समोरून एका व्यक्तीने त्यांचा फोन उचलून फोन, चावी, गाडी आणि दूध बाहेरच असल्याचे सांगून व्यक्ती गायब असल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच घरच्यांनी सदर इमारतीत धाव घेत विचारपूस केली असता रात्री ८ वाजण्याच्या सुमारास व्यक्तीचा मृतदेह आढळून लिफ्ट खाली आढळून आला. घरच्यांनी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

डॉक्टरनेच घेतला जीव, पुण्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; हवेत उडून जमिनीवर धाडकन आपटला अन्…
सदर मयत व्यक्तीचे नाव जटा शंकर पाल (४५) असून त्याचा दुधाचा व्यापार होता. मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दूधवाला इमारतीत येत असल्याने त्याच दरम्यान ही घटना घडली असावी, असा अंदाज स्थानिकांनी दर्शवली आहे. मयत जटा शंकर हा लिफ्टखाली कसा गेला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे कारण अद्याप समोर आले नसून तो एखादी वस्तू बाहेर काढण्यासाठी लिफ्ट खाली उतरला असावा आणि बाहेर निघता न आल्याने त्याचा लिफ्ट खाली चिरडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत पोलीस तपासानंतर जटा शंकर चा मृत्यू कसा झाला याचा छडा लागणार आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed