• Mon. Nov 25th, 2024
    सोमय्यांच्या व्हिडीओवरुन सभागृह तापलं, दानवे आक्रमक, गोऱ्हे म्हणाल्या, तो व्हिडीओ लावू नका!

    मुंबई : जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो, त्याच पक्षाच्या माजी खासदाराचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत. काही माता भगिणींनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याने ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून तसेच स्वत:च्या पक्षातल्या महिलांना पद देतो, जबाबदारी देतो, महामंडळं देतो, असं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केलेत. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. हा व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. असे जे राजकीय दलाल-उपरे महाराष्ट्रात आलेले आहेत आणि मराठी भगिनींचा छळ करतायेत त्या किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडली. तसेच संबंधित व्हिडीओचा पेनड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. दुसरीकडे सरकारी पक्षाच्या बाजूने निवेदन करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा शब्द विरोधकांना दिला.

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. नियम २८९ च्या अंतर्गत या प्रकरणावर विरोधकांनी चर्चेचा आग्रह धरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. अंबादास दानवे बोलत असताना सभागृहातील विरोधी पक्षाचे आमदार ब्लॅकमेलर, लाव रे तो व्हिडीओ अशी शेरेबाजी करत होते. तेवढ्यात ‘प्लीज तो व्हिडीओ लावू नका’, असं उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ते व्हिडीओ बघणं माझ्यासाठी कठीण काम असेल. पण महिला पोलिस आणि डॉक्टरांना मी व्हिडीओ बघायला सांगेन आणि त्यांची मतं मी त्यांना विचारेन, असं गोऱ्हे म्हणाल्या.

    सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ, चौफेर टीकेनंतर पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांना पत्र लिहिलं
    ज्याच्यावर सेक्स व्हिडीओचा आरोप आहे, त्याला भारतीय जनता पक्ष संरक्षण देणार का? असा माझा प्रश्न आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपने याचं उत्तर द्यावं, असा आग्रह देखील दानवे यांनी धरला. पीडित माता भगिणीचा टाहो राज्य सरकार ऐकणार आहे का? असा सवालही दानवे यांनी विचारला.

    आशिष शेलार आणि जयंत पाटलांनी शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं, उत्तर देता देता दमछाक!
    दानवे म्हणाले, काही लोक ईडीची भीती दाखवतात, सीबीआयची भीती दाखवतात, याच्या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेल करतात. तीच व्यक्ती त्यांच्याच पक्षातल्या महिलांना पद देतो, जबाबदारी देतो, महामंडळं देतो, असं आमिष दाखवून महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करते. जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो, त्याच पक्षाच्या माजी खासदाराचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत. काही माता भगिणींनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. गुन्हा करणारी व्यक्ती महत्वाची नसून ही अपप्रवृती महत्वाची आहे. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतो, त्याच सुरक्षेच्या बळावर जर तो व्यक्ती असा अन्याय अत्याचार करत असेल तर त्याची सुरक्षा तत्काळ काढून घ्या, असं दानवे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed