• Mon. Nov 11th, 2024
    धक्कादायक! पुण्यात IT कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न; तलवार, कोयते, मिरची पूडसह आरोपी अटकेत

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रात्रीच्या वेळी आयटी कंपनीतील कर्मचारी घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीतील टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी येथे दबा धरून बसलेल्या एका अल्पवयीन आरोपीसह चौघांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी (१५ जुलै) पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली.

    व्यंकटेश सुरेश नाईक (वय २४), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३), शेखर काळूराम जांबुरे (वय १९, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला. या प्रकरणी पोलिस अंमलदार विनायक घारगे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जण संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले.

    वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली, काच फोडून दोघांना बाहेर काढले, पुण्यात थरार

    दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाइल फोन, एक दुचाकी असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed