पुणे: पुणे – नगर कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदी पुलावरील वळणावर आज पहाटे रात्री साडेतीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे – नगर महामार्गावरून ही गाडी साधारण पन्नास ते साठ फूट खड्ड्यात ही गाडी पलटी झाली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या गाडीतील तरुणाला ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले. गाडीच्या एअर बॅग वेळेत ओपन झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ऋषिकेश यादव (वय ३५), एकनाथ शिंगाल (वय ३३) अशी गाडीतून वाचवण्यात आलेल्या तरुणांची नावे असून यात दे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजुने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक स्विफ्ट
एम एच १२ टी के ३९७६ या गाडीचा वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात पलटी झाली. मात्र, या गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.

तरुणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन केला. मात्र तातडीने कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांना यायला अर्धा पाऊण तासाचा उशीर झाला. मोठी घटना घडली असती तर अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले असते. असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळणार नसेल आणि पाऊण तास वाट पाहावी लागणार असेल तर १०८ च्या सेवेविषयी बोलायचं काय आणि कोणाच्या भरवश्यावर रुग्णांनी राहायचे असा प्रश्न पडत असून आता १०८ स्वतःची सुविधा वेळेत उपलब्ध करून देणार की रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.