• Sat. Sep 21st, 2024

गिर्यारोहक पत्नीचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू; माउंट एव्हरेस्ट सर करत पतीकडून श्रद्धांजली

गिर्यारोहक पत्नीचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू; माउंट एव्हरेस्ट सर करत पतीकडून श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वयाच्या ५० वर्षांनंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करायचा ध्यास मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी घेतला होता आणि १० वर्षांनी त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले आहे. याच मोहिमांदरम्यान एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी पत्नी अंजली यांना गमावले होते. हे एव्हरेस्ट शिखरही त्यांनी पुन्हा सर करून अंजली यांना अनोखी श्रद्धांजलीही वाहिली आहे.

मागील दहा वर्षांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांनी स्वतःचे स्वप्न साकार करण्यासोबतच एव्हरेस्टसह सात शिखरे सर करणारे भारतातील सर्वाधिक वयाचे गिर्यारोहक म्हणून कुलकर्णी यांना ओळख मिळाली आहे. या संदर्भात प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत माहिती देण्यात आली.

नागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरीच; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’शिखर सर केलं

वयाच्या पन्नाशीनंतर कुलकर्णी यांनी ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियुस्को पत्नी अंजलीसह सर केले. त्यानंतर या दोघांनी आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर केले. तिसरी मोहीम होती ती माउंट एव्हरेस्टची. या मोहिमेत अंजली यांचा हिलरी स्टेप येथे २२ मे २०१९ला अपघाती मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरून कुलकर्णी यांनी अंजली यांना वचन दिल्याप्रमाणे उर्वरित चार खंडातील चार सर्व्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये अकांकागुहा (दक्षिण अमेरिका), देनाली (उत्तर अमेरिका), एलब्रस (युरोप), विन्सन (अंटार्टिका) या शिखरांचा समावेश होता.

एव्हरेस्टसह सात शिखरे सर करणारा भारतातील सर्वांत वयस्कर गिर्यारोहक होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी केला आहे. वयाची ६० वर्षे सहा महिने आणि तीन दिवस पूर्ण झाले असताना त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले.

माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पूर्ण, उतरताना अपघात; पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने पुण्यात हळहळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed