• Mon. Nov 25th, 2024
    आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप, थकित रक्कम ठरली होती कारण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू अशी दोषींची नावे आहेत. त्यांच्यावर उषा कांबळे आणि त्यांची दीड वर्षांची नात राशी यांच्या हत्येचा आरोप होता.

    ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तपासात तीन सज्ञान व एक अल्पवयीन असे चार आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ३५ साक्षीदार पडताळण्यात आले आहेत. आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चारचाकी महिंद्रा एक्सयूव्ही-५०० गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांच्या रक्ताचे डाग मिळून आले.

    तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेल्या रक्ताच्या डागाच्या नमुन्याच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणीमध्ये उषाबाई कांबळे यांचा डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. गावंडे यांनी तिन्ही आरोपींनी दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली तर ॲड. समीर सोनावणे यांनी त्यांना कांबळे कुटुंबीयांच्या वतीने सहकार्य केले.

    अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती!
    नागपूर शहरातील प्रसिद्ध कांबळे कुटुंबीय खून खटल्याचा शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने गणेश शाहू, त्याची पत्नी गुडिया शाहू आणि एका अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एस.बी. गावंडे यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

    ‘सुस्साट दादा’, कामकाजाला सुरुवात, अजित पवारांकडून ‘तिजोरी’ची झाडाझडती!
    नेमकं प्रकरण काय होतं?

    फिर्यादी रविकांत कांबळे यांची आई उषाबाई कांबळे यांचा गणेश शाहू व त्याची पत्नी गुडिया शाहू यांच्याकडे थकीत रकमेवरून वाद झाला होता. या वादातून शाहू दाम्पत्याने इतर अल्पवयीन मुलांसह उषाबाई कांबळे आणि दीड वर्षांची नात राशी कांबळे यांची १७ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपींनी मृतदेह गोणीत टाकून घराजवळील नाल्यात फेकून दिला होता. उषा कांबळे या नातीला घेऊन ज्वेलर्सकडे पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्या होत्या. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

    हे हत्याकांड समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. या खटल्यात सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. तब्बल पाच वर्षांच्या खटल्यानंतर आज सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा जाहीर केली.

    सुदैवाने जीव वाचला, नाहीतर आज माझी मुलगी दिसली नसती; पीडित तरुणीच्या आईने सांगितली हकिगत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed