पुणे : चांद्रयान- ३ ही मोहीमेची आज यशस्वी सुरुवात झाली. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून चांद्रयान-३चे यशस्वी उड्डाण झाले. आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी त्याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या ठिकाणी दहा दिवस थांबून तेथील अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील दोन व्यक्तींचा मोठा सहभाग होता. त्यांचाही ही मोहीम यशस्वी होण्यात मोठा वाटा आहे. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे सुपुत्र असिफभाई महालदार आणि त्याच भूमीत शिकलेले आता इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेले मयुरेश शेटे यांनी जुन्नर तालुक्याची मान उंचावली आहे.
या चांद्रयान मोहिमेत प्रक्षेपण होत असताना दुर्देवाने काही धोका निर्माण झाल्यास. मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यातील हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आग्निशमक यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. याचे सहा कोटींचे कॉन्ट्रॅक्ट असिफभाइ महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीला मिळाले होते. त्यांनीच श्रीहरीकोटा येथे ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. तसेच राजुरी गावचे शाळेचे विद्या विकास मंदिराचे माजी विद्यार्थी आणि याच विद्यालयाचे माजी प्राचार्य कैलास शेटे यांचे चिरंजीव मयुरेश शेटे हे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा देखील या मोहिमेत मोठा सहभाग आहे.

देशाच्या या अभिमानास्पद कामगिरीत जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे सुपुत्र आणि माजी विद्यार्थ्याचा सहभाग असल्याने गावचे नाव देश पातळीवर पोहचवण्याचे काम या दोघांनी केले आहे. त्यामुळे दोघांचे देखील गावाने अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
२२ जुलै २०१९ रोजी भारताने राबवलेली चांद्रयान २ ही मोहीम अयशस्वी ठरली होती. तेव्हा आपले यान यशस्वीपणे चंद्रावर पोहचले परंतू सॉफ्टलॅडिंग न होता, ते क्रॅश झाले होते. परंतू अपयशाने खचून न जाता इस्त्रोचे प्रमुख एम. सोमनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा चांद्रयान-३ मोहीम मोठ्या आत्मविश्वासाने आखली आहे. ती यशस्वी देखील करून दाखवली आहे.