• Sat. Sep 21st, 2024
मद्यपींमध्ये बिर्याणीवरून वाद, तरुणाने रागात उचलले लाकूड अन्…

नागपूर : खापरखेडा मुख्य बाजारपेठेतील नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील गुरुवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास एका वृद्धाची लाकडाने बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तासातच आरोपीला अटक केली. मृतकाचे नाव महेंद्र गोपाळराव सोमकुवार (५३) आहे. शुभम फागुलाल उईके (२९) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि मृत दोघेही निराधार आहेत.
आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप, थकित रक्कम ठरली होती कारण
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर फोन करून संजू मामा पोहेवाले यांच्या दुकानासमोर दोन लोकांमध्ये भांडण झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिथे पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक माणूस दिसला. जखमीला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथे नेण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने चिचोली येथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पाठवण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत ईसम हा मूळचा कामठी येथील आहे. तो खापरखेडा येथे पत्नी आणि मुलांसह राहत होता. मात्र पाच-सहा वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर मृताने घर सोडले. मृतक हा रात्रीच्या वेळी रेल्वे चौकी मार्केटमधील फळांच्या दुकानात काम करायचा. मुख्य रस्ता, माता मंदिर परिसरात जागा मिळेल तिथे तो झोपायचा. आरोपी शुभम हाही बेघर होता. तो दिवसा अन्नमोड येथील हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री नागपूर जिल्हा मध्यवर्ती ऑपरेटीव्ह बँकेसमोर चौकीदारी करायचा.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी आणि मृतक यांच्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी दोघेही मद्यपान करत होते. बिर्याणीच्या वादातून मृतकाने आरोपीला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने शुभमने वृद्धाला लाकडाने मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. खापरखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed