• Sat. Sep 21st, 2024

मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत तार बाजूला करण्यासाठी गेला

मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत तार बाजूला करण्यासाठी गेला

सोलापूर: जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मुलाच्या निधनामुळे आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोंबकळत असलेली विद्युत वाहिनी जोडत असताना शॉक बसल्याने विवाहित तरुण मरण पावला. ही दुर्घटना सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे घडली. राहुल अभिमान सातपुते (वय २६ रा. नान्नज ता. उत्तर सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शेतातील रस्त्यावर विद्युत तार लोंबकळत होती

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील गावात भारत लांडगे यांच्या शेतात विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर लोंबकळत होती. याचा त्रास दुसऱ्यांना होऊ नये म्हणून त्याने तुटलेली वाहिनी ओढून बांधत होता त्यावेळी असताना शॉक लागून राहुल सातपुत हा बेशुद्ध पडला. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही; पोलीस ठाण्यातील ASIने निरीक्षकाच्या नावे पाहा काय केलं
आई वडिल व पत्नीवर दुःखाचा डोंगर

राहुल सातपुते याचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. राहुल हा आई वडिलांना एकुलता मुलगा होता. सुखी संसाराचे दिवस पाहण्या अगोदर राहुल जगातून गेल्याने आई वडील व पत्नी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राहुलच्या निधनाने संपूर्ण गावाला देखील शोक अनावर झालाय. पत्नीच्या निधनाचे वृत्त कळताच नवविवाहित पत्नीची शुद्ध हरपली. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

४०० फूट खोल दरीत एसटी कोसळली, कंडक्टरनं सांगितलं अपघाताचं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed