• Sun. Sep 22nd, 2024

धक्कादायक! हळगाव येथे शेततळ्यात आईसह दोन मुलांचे आढळले मृतदेह; हत्या की…

धक्कादायक! हळगाव येथे शेततळ्यात आईसह दोन मुलांचे आढळले मृतदेह; हत्या की…

अहमदनगर : तालुक्यातील हळगाव या ठिकाणी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेततळ्यामध्ये आईसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाण्यात बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? या बाबत पोलीस तपास करीत आहेत.

या घटनेप्रकरणी पोलीसांकडून माहिती मिळाली आहे.या घटनेतील मृत मुलांची आई चांदणी (उर्फ) उमा बबन पाचारणे (वय ३१ वर्ष रा. हळगाव) ही आपल्या दिपाली बबन पाचारणे (वय ११ वर्ष) व राजवीर बबन पाचारणे (वय ८ वर्ष) या दोन मुलांसह सोमवारी १० जुलैला हळगाव येथिल रहात्या घरातून बेपत्ता झाली होती. दिवसभर तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र हे तिघेही आढळून आले नाही. त्यामुळे मृत महिलेचे पती बबन पाचरणे यांनी ११ जुलैला जामखेड पोलीस स्टेशनला पत्नी व दोन मुले हरवले आहेत, आशी तक्रार दाखल केली होती.

यानंतर बुधवारी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेततळ्यामध्ये चांदणी (उर्फ) उमा बबन पाचरणे (वय ३१ वर्ष), दिपाली बबन पाचारणे (वय ११ वर्ष, मुलगी) आणि राजवीर बबन पाचारणे (वय ८ वर्ष, मुलगा) या तिघांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आले. परीसरातील नागरिकांनी हळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांना या घटनेची माहिती कळवली. या नंतर पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी ही माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळवली. या नंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

गावकऱ्यांच्या मदतीने शेततळ्यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलून तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बडे हे करीत आहेत.

शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने गटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे मृत्यू बाबत पोलीस आधिक चौकशी करत आहेत, आशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत. आईसह तिघांच्या मृत्यूने हळगाव सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed