• Sat. Sep 21st, 2024
राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार, खातेवाटपासाठी नाही तर यासाठी मंत्रिमंडळ विस्तार रखडला?

गुरुबाळ माळी, कोल्हापूर : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप काँग्रेसच्या एका गटामुळे अडकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा गट भाजपसोबत येण्याच्या तयारीत असून तो आल्यानंतरच विस्तार आणि खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप बरोबर सहभागी झाला. त्यातील नऊ नेत्यांना मंत्रिपद मिळाले, पण अजूनही खातेवाटप झालेले नाहीये.

राष्ट्रवादीच्या सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अनेकांना मंत्रिपद मिळणे कठीण झाले आहे. हे नेते सध्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत आहेत. पण ‘मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त’ या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे.

दरम्यान, काँग्रेसचा एक मोठा गट भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मुंबई आणि दिल्लीत हालचाली सुरू आहेत. हा गट सोबत आल्यास त्यांना तीन मंत्री पदे देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप रखडले आहे.

आमदार केलं, साई संस्थानाचा अध्यक्ष केलं, ताकद दिली पण पवारांना रामराम करुन युवा आमदार अजितदादांच्या साथीला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. या बैठकीत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट आल्यास त्यांना काय द्यायचे? याबाबत गेले काही दिवस दिल्ली पातळीवर चर्चा सुरू आहे. मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

आठ दिवसानंतरही खातेवाटप न होण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची चर्चा वेगावली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीही काँग्रेससोबत येण्याबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांसमोर गौप्यस्फोट केले.

अजितदादांच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि दालनांचं वाटप, वाचा संपूर्ण लिस्ट!
महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याचे वृत्त दिल्लीतील पक्षनेत्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांनी यातील अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून बैठक घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेकांना पक्ष न सोडण्याबाबत समजावलं. दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर काहींची मानसिकता बदलल्याची चर्चा आहे. पण अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याने आता नक्की काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed