• Mon. Nov 25th, 2024
    Nashik Bus Accident : सप्तश्रृंगीगड घाटात भीषण अपघात, ३५ प्रवाशांसह बस थेट दरीत कोसळली

    नाशिक : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे

    सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

    पावसाळ्यात फिरायला गेले अन् ढगफुटीत अडकले; पुण्यातील पर्यटकांसोबत हिमाचलमध्ये काय घडलं?
    बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात नेले जात आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघात स्थळाच्या दिशेने रवाना झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

    Mumbai News: रेल्वे स्टेशनवर लावलेले जनजागृतीचे स्टिकरच धोकादायक; नेमका काय आहे प्रकार?
    “सप्तश्रृंगी घाटात ST बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना”
    – दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

    समृद्धी महामार्गावर अपघात का होतायेत? तज्ञ अभियंत्यानं सांगितलं नेमकं कारण, तर अपघात कमी करण्यासाठी उपाय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed