• Mon. Nov 25th, 2024

    अशोक चव्हाण संपर्कात असल्याची चर्चा अन् मंत्र्यांच्या खातेवाटपावर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

    अशोक चव्हाण संपर्कात असल्याची चर्चा अन् मंत्र्यांच्या खातेवाटपावर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

    जळगाव : काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मात्र कुणाला घ्यावं, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आता आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आहेत. हे त्याबाबत निर्णय घेतील, असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

    काँग्रेस चे नेते अशोक चव्हाण हे संपर्कात असल्याची चर्चा आहे? यावरही मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. पण आम्हाला पुन्हा तीन उपमुख्यमंत्री तसेच दोन मुख्यमंत्री करता येत नाही. पण कोणाला कधी घेणार, काय म्हणून घेणार हे सांगू शकत नाही. मात्र २०२४ च्या निवडणुकांच्या आधी राज्यात मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील, असं सूचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं.
    मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेचे विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा ताटकळत, असंवेदनशीलतेवर नेटिझन्सचा संताप
    आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने अनेकांचे खाते बदलतील. अनेकांचे कमी होतील. आधीच माझ्याकडेही दोन ते तीन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा पदभार आहे. तसेच तीन वेगवेगळे खाते आहेत. आता ४० मंत्री होतील. त्यामुळे खाती वाटली जातील, असं महाजन म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जामनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज जामनेर शहरात रोजगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
    वडील गावोगावी कपडे विकतात, कष्टकरी दाम्पत्याच्या लेकीची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी
    विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंना टोला

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भाला काय दिलं, किती निधी दिला? सिंचनासाठी कोणतीही योजना दिली नाही. कोणत्या योजनेसाठी निधीही दिला नाही. एखादं तरी काम त्यांनी केलं, असं सांगावं. आणि आता सत्ता नसताना ते विदर्भाचा विकास करायला जात आहे, हे अतिशय हास्यास्पद आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगवाला. मुख्यमंत्री असताना ते कधी घराबाहेर पडले नाही. विदर्भात त्यांचा एकदाही दौरा झाला नाही. आणि ते म्हणतायेत विदर्भाच्या दौऱ्यावर निघालो. मात्र आता विदर्भाच्या जनतेला हे मान्य नाही, अशी टीका महाजनांनी केली.

    अजित दादा आपल्याकडे आले, आता काँग्रेसवाले पण येतील | गुलाबराव पाटील

    विधान परिषद सभापती निवडीचं काय?

    भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष सत्तेत एकत्र आहेत. आमच्याकडे आता विधानसभेचे ४० पेक्षा जास्त आमदार आलेत आहे. विधान परिषदेचे सहा ते सात आमदार आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी आमच्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती कोण राहील? याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असं गिरीश महाजन म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed