तळेगाव नगरपरिषदेसमोर किशोर आवारे यांच्यावर पहिल्यांदा गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला. या हत्येत भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे यांच्या मुलाचा सहभाग असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं. पोलिसांनी या घटनेचा तपास योग्य दिशेने करून मुख्य आरोपी असणाऱ्या भानू खळदे याला अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून भानू खळदे फरार होता. पोलिसांच्या हाताला लागणार नाही, याची त्याने पूरेपूर काळजी घेतली. पण अखेर भानू खळदेला पोलिसांनी शोधून काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
घटना नेमकी काय?
कुठल्याशा कारणावरुन किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मनात धरून भानू खळदे याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे काहीच दिवसांत खळदे याचा मुलगा गौरव खळदे याने कट रचून किशोर आवारे यांचा काटा काढला. हत्येनंतर भानू खळदे फरार होता.
दोन वेळा किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट आखण्यात आला होता. मात्र पोलिसांकडून तो कट उधकाण्यात आला होता. यातील पाच आरोपींना अटकही करण्यात आली. प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मात्र मुख्य आरोपी असलेल्या भानू खळदेने हत्येनंतर पुणे सोडलं. गेली दीड महिना तो फरार होता. मात्र आता या हत्येतील मुख्य सूत्रधाराला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून नेमकी हत्या कोणत्या कारणास्तव केली, याचा जबाब लवकरच खळदे देईन, त्यामुळे आवारे यांच्या हत्येचं कार आता लवकरच समोर येणार आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्याचे काम सुरु आहे.