अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि उत्तर-प्रत्युत्तराचे सत्र जोरदार सुरू आहे. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेना शिंदे गट आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यानंतर मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत शरद पवार गटाचे नेते आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
Dilip Walse Patil Knows About Eknath Shinde Rebel Says Jitendra Awhad : अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजब, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. आता या राजकीय घडामोडीत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची माहिती दिलीप वळसे पाटील यांना होती, असं सांगण्यात येत आहे.
‘ठाण्याचा पठ्ठ्या’ असा उल्लेख अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला होता. ठाण्यातल्या पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादीतून अनेक बडे आणि चांगले नेते बाहेर गेले. गणेश नाईक, संदीप नाईक हे सोडून गेले. वसंत डावखरे यांनाही त्रास दिला. किसन कथोरेही सोडून गेले. आम्ही माणसं जोडायचं काम करतो आणि माणसं तोडणाऱ्याला साहेब जवळ करतात? असं म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली होती.
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. ठाण्यातील कळवा पुलावर बॅनर लावण्यात आले आहे. ‘ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान आहे… होता… आणि मरेस्तोवर राहील..’ असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. कळव्याहून ठाण्याच्या दिशेने येताना लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा येथे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी भर पावसात भाषण केलं होतं. या भाषणाच्या वेळेचा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचा संदेश देत दंड थोपटल्याचं चित्र आहे.