• Mon. Nov 25th, 2024
    चीनची शान झाली संगमनेरच्या राहुलची ‘जान’, परदेशात शिकताना जुळला विवाह’योग’

    अहमदनगर : भारत आणि चीन या दोन देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र अशात चीनची शान ही भारताची सूनबाई तर संगमनेरचा राहुल हा चीनचा जावई झाला आहे. चीनची कन्या शान हिचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील व सध्या चीनमध्ये योगाचे शिक्षण घेणाऱ्या राहुल हांडे बरोबर सूत जुळले. दोघांचे मनोमिलन झाले आणि ते बोहल्यावर चढले.

    नवविवाहित पत्नीची आपल्या नातेवाईकांशी ओळख व्हावी म्हणून राहुल आणि शान या नवदाम्पत्याने फाईव्ह स्टार हॉटेल टाळत, चक्क आपल्याच मायभूमीत विवाह सोहळा आयोजित केला. घारगाव सारख्या खेडेगावातील एका मंगल कार्यालयात दोघांनी भारतीय संस्कृतीनुसार सात फेरे घेत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे.

    संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयाच्या योगा विभागात धडे गिरवले आणि या विषयातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो भारत देश सोडून तो चीनला गेला. तिथे योगा शिकत असतानाच त्याची ओळख शानशी झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुलने आई वडिलांची भेट घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यांनीही मोठ्या मनाने होकार दिला.

    सत्तर महिलांशी अश्लील चाळे, व्हिडिओ क्लीप व्हायरल, कोल्हापूरचा बोगस डॉक्टर अखेर अटकेत
    अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणाऱ्या तसेच दुष्काळ कायमच पाचवीला पुजलेल्या भोजदरी या छोट्याशा गावातील २९ वर्षीय राहुल हांडे याने चक्क ३१ वर्षीय शान यान छांग या चीनी तरुणीशी चायनीज पद्धतीने कोर्ट मॅरेज केले. तीन ते चार दिवसांपूर्वी तो तिला महाराष्ट्रात भोजदारी सारख्या एका डोंगर दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या छोट्याशा गावाची सून करून घेऊन आला.

    भावाच्या लग्नाहून परतताना विरारच्या कुुटुंबावर काळाची झडप, पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू
    महाराष्ट्रीयन पद्धतीने दोन ते तीन दिवसांपासून या आंतरराष्ट्रीय विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत होती. अखेर लग्नघटीका जवळ आली. दोघांच्या हातावर मेहंदी रंगली आणि शान राहुलला हळद लागली. भटजीने शुभ मंगल सावधान झाल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली.

    अंगणात खेळून घरात आला न् जमिनीवर कोसळला, कार्तिकच्या मृत्यूचं कारण समजताच कुटुंबाचा हंबरडा
    यानंतर राहुलने लग्नाला आलेल्या सर्व नातेवाईकांशी शानची ओळख करून दिली. महाराष्ट्रीयन परंपरा तिला समजावून सांगितल्या. यावेळी घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कामेश टावरे यांनी शानशी चायनीज भाषेत संवाद साधला. या शुभविवाह प्रसंगी राहुलचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सनई-चौघडे नव्हे तर राष्ट्रगीताचे सूर अन् हाती संविधानाची प्रत अन्; ४५ वधू-वरांनी बांधली लग्नगाठ

    राहुल हांडे या भोजदरीच्या तरुणाने चिनी शान या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून आम्हाला अगोदर धक्काच बसला. परंतु त्याच्या करिअरच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. शानमध्येच आम्ही राहुलचे भवितव्य पाहिलेले आहे. त्यामुळे कोणाचाही त्याच्या लग्नाला विरोध झाला नाही. लग्नासाठी त्यांचे आई-वडील इतर नातेवाईक सुद्धा येणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाही. नंतर कधीतरी ते नक्कीच भोजदारीला येतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed