हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओरसला आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे. यामुळे घाटमाथा सोडला तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होईल. तर विदर्भात २ दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता असून इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.
संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )
उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोकणात पाऊस सुरू आहे. अशात ५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही ५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरकळ ठिकाणी पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ५ जुलैला मात्र जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर ५ जुलैला मात्र पाऊस ओसरले अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यावेळी काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मराठवाडा (Marathawada )- मराठवाड्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उद्या तुरळक पावसाचा इशारा आहे. तर ५ जुलैलादेखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ (East Vidarbha – West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात आजपासून ५ जुलैपर्यंत अतिमुळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.