• Sat. Sep 21st, 2024

आधी पत्नीला संपवलं, मग स्वतःला, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना, १३ वर्षांची लेक अनाथ झाली

आधी पत्नीला संपवलं, मग स्वतःला, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना, १३ वर्षांची लेक अनाथ झाली

नागपूर : नागपुरात हत्येचे सत्र सुरूच आहे. रविवारी पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सदरमध्ये सकाळी सात वाजताचा सुमारास उघडकीस आली. हत्या झालेल्या पत्नीचे नाव सोनिया मंडले ( ३८ वर्ष) तर आरोपी पतीचे नाव राजेश मंडले (४५ वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आहे. आठवड्याभरात उपराजधानीतील ही हत्येची पाचवी घटना सामोर आली आहे.
आजीला बोलावण्यासाठी घरातून निघाली, नराधमाने रस्त्यावरून मुलीला उचललं अन् घरी नेवून…
राजेश मंडले हा बेरोजगार होता आणि त्याचे सोनियाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहू लागली. यानंतर राजेश याने सोनियाशी प्रेमविवाह केला. दोघांना १३ वर्षांची मुलगी आहे. सोनिया मोईल या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दोघांच्याही आयुष्याची सुरुवात छान चालली होती. पण राजेशला कर्करोग झाल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यावर उपचार करत होती. मात्र, दिवसेंदिवस हा आजार वाढत होता. त्यामुळे चिडचिड निर्माण होऊन त्याचा पत्नीशी सतत वाद होत होता.
नोकरी मिळवून देण्यासाठी महिलेला भेटायला बोलावलं, मित्रा सोबत मिळून केला धक्कादायक प्रकार
रविवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि राजेशने पत्नी सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याची तेरा वर्षांची मुलगी उठली आणि तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला तिचे वडील लटकलेले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती जोरात ओरडली. त्यामुळे शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली. आणि या घटनेची माहिती सदर पोलिसांना देण्यात आली. महिती मिळताच सदरचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना माहिती मिळताच लगेच पथकासह घटनास्थळावर पोहोचले.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

पती-पत्नीचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे मॉईल कॉलनीत खळबळ उडाली आहे. राजेश हा रागीट स्वभावाचा होता. त्यामुळे तो अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे त्याने तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed