• Mon. Nov 25th, 2024
    आषाढी वारीतून परतताना नियतीने साधला डाव, ट्रकच्या धडकेत वारकरी महिलेचा मृत्यू

    पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर एका ६५ वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. दगडाबाई बाळू खुपसे (६५) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकरी महिलेचे नाव आहे. तर नाना सुखदेव कावरे (३५) असे ट्रकचालकाचे नाव आहे.
    Sindhudurg News: करुळ घाटात किर्रर्रर्र अंधार, गाडीवरचा कंट्रोल सुटला अन् नवरा-बायको गाडीसकट ३५० फूट खोल दरीत
    मिळालेल्या माहितीनुसार, दगडाबाई खुपसे या वयोवृद्ध वारकरी महिला या आषाढी वारीनिमित्त पायी पंढरपूरला गेल्या होत्या. आज दुपारी तीनच्या त्या पंढरपूर वरून पुणे – सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावरून कोलवडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघाल्या असता. पुण्याच्या दिशेकडून लोणीकंदकडे निघालेल्या एका ट्रकच्या मागील चाकाखाली खुपसे सापडल्या गेल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी पाचच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    कोलवडी गावचे माजी उपसरपंच भागवत खुपसे यांच्या त्या मोतोश्री होत्या. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच पूर्व हवेलीसह परिसरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यात अनेकांचा बळी गेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

    खंडाळ्यातील टँकरच्या भडक्यात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त, एकाच घरातील ३ जणांचा होरपळून मृत्यू

    याच महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडत असताना बुधवारी रोजी एका ज्येष्ठाचा दुचाकीची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच महामार्गावर पुन्हा आज रस्ते अपघातात एका वारकरी महिलेचा मृत्यू झाल्याने रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed