• Sat. Sep 21st, 2024

सोन्याचा पाऊस पडणारे गाव? महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात सापडला ६०० वर्षांपूर्वींचा ऐतिहासिक खजिना

सोन्याचा पाऊस पडणारे गाव? महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात सापडला ६०० वर्षांपूर्वींचा ऐतिहासिक खजिना

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध होतं, असं बोललं जातं. कारण या गावात गावकऱ्यांना सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. याशिवाय येथे इतरही अनेक प्रकारची नाणी सातत्याने सापडत असतात. अशातच आता येथील एका ग्रामस्थाला बहमनी नाणे सापडले असून हे नाणे १४६३ ते १४८२ या काळातील आहे.

कसबा बीड येथील राहणारे ग्रामस्थ अमोल बाळासो तिबीले यांचे तुळशी घाट परिसरात शेत आहे. या शेतात काम करत असताना त्यांना एक बहमनी कालीन नाणे सापडले. सदर नाणे १.७ सेमीचा आहे. तर याचे वजन ७.५ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट असे फारसी अक्षरांचे अंकण केलेले दिसते. हे नाणे बहमनी सुलतान शम्शुद्दीन मुहम्मद शाह तिसरा यांच्या इसवी सन १४६३ ते १४८२ कारकीर्दीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे नाणे सोन्याचे नाही, अशी माहिती मिळाली आहे.
राधानगरीतील १०० वर्षे जुना ऐतिहासिक खजिना झाला खुला! पर्यटकांना जवळून पाहण्याची संधी
अमोल तिबीले यांचे तुळशी नदी किनारी शेत आहे. येथे यापूर्वी सोन्याच्या बेडा, सोन्याचा नाग यासह बहमनी कालीन नाणी, ब्रिटिश कालीन नाणी सापडली होती. कसबा बीड – महे दरम्यानचा पूल बांधण्याआधी या शेतातून आरे गावाला जाणारी वाट होती. येथे आढळणारी ही नाणी पाहता ही वाट शिलाहार कालीन असून तिचा वापर इंग्रज काळापर्यंत होत असावा असे बोलले जाते. गावात सापडणारी ही नाणी कसबा बीडच्या प्राचीन वैभावाची जणू साक्ष देत आहेत.

कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या ३२ कारागिरांना GI प्रमाणपत्र; थेट राष्ट्रीय स्तरावर मान्यता

सोन्याचा पाऊस पडणारे गाव?

गावामध्ये अनेकांना यापूर्वी सोन्याची नाणी सापडली आहेत. त्यामुळे सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशीही एक वेगळी ओळख आहे. याच गावात २०२० मध्ये येथील यंग ब्रिगेडच्या तरुणांना उत्खनन करत असताना गावातील राजाराम वरुटे यांच्या शेतामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक वीरगळ आणि शिलालेख सापडले होते. शिवाय काही पुरातन वास्तूचे सुटे भागही आढळले होते. तर आता हे नाणे आढळल्याने पुरातत्व विभागानेही लक्ष घालून या प्राचीन अवशेषांचे जतन करून आणखी संशोधन होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed