• Mon. Nov 25th, 2024

    शिंदे गटाच्या त्या वादग्रस्त जाहिरातीवर आता मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा

    शिंदे गटाच्या त्या वादग्रस्त जाहिरातीवर आता मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा

    कोल्हापूर : शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला, त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव उठाव आणि आमची गद्दारी असं कसं होईल? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून आम्ही उठाव केला, असे केसरकर म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

    ‘… तोपर्यंत जाहिरात प्रिंटिंगला गेली होती ‘

    यावेळी त्यांनी शिंदे गटाने दिलेल्या वादग्रस्त जाहिरातीवरही भाष्य केलं. मुळात ही जाहिरात मुख्यमंत्र्यांना दाखवून दिलेली नव्हती. ज्या दिवशी हे जाहिरात देण्यात आली त्या दिवशी रात्री याबाबतची माहिती त्यांना मिळाली. आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ही जाहिरात थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रात्री उशीर झाल्याने तोपर्यंत जाहिरात प्रिंटिंगला गेली होती. त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते. म्हणून नंतर दुसऱ्यादिवशी दुसरी जाहिरात दिली, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले. हे सरकार औटघटकेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे कोणताही विचार न करता बोलणारे व्यक्तिमत्व आहे. औटघटकेचं सरकार म्हणणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांना फारसे सीरियस घेऊ नका, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला.

    महाराष्ट्राच्या इतिहासात असा उठाव फक्त दोनदा झाला. शरद पवार यांनी उठाव केला. त्यानंतर ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेने सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाची फरपट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला. एवढी वर्ष नेतृत्व करणारी माणसे बाजूला गेली. याचं आम्हालाही दुःख होतं. मात्र असे सल्ले घेतले की घरच्या लोकांमुळे पक्ष कसा अडचणीत येतो हे सगळा महाराष्ट्र बघत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

    Sharad Pawar: मी गुगली टाकला अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचं भाष्य
    वारीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल भक्त व्हावे लागते

    आज आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शासकीय पूजा पार पडत असते. मात्र अनेक मुख्यमंत्री हे आजपर्यंत केवळ पूजेसाठी येत असतात. मात्र एकनाथ शिंदे हे दोन दिवस आधीच पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि प्रत्येक कामाची त्यांनी पाहणी केली. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे त्यांनी सांगितले.

    BRS कडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, KCR यांच्या पंढरपूर दौऱ्यावर राजू शेट्टींचा मोठा दावा
    काही लोक मुख्यमंत्री झाले म्हणून पंढरपूरला येऊन पूजा करतात. पण वारीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल भक्त व्हावे लागते. आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री नाही तर भक्त होऊन शेतकरी परंपरा जपत दोन दिवस आधी येऊन त्यांनी कोणत्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये आणि सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. यंदा पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरू असतानाही भाविकांना दर्शन घेता आले. तर पंढरपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निधीही दिला आहे, असे केसरकर म्हणाले.

    कोल्हापूरच्या प्रतिपंढरपूरात नेत्रदिपक रिंगण सोहळा, टाळ-मृदुगांच्या गजरात वारकरी विठू रंगी रंगले

    ‘आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो’

    २०२४ नंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस यानी अत्यंत सावध उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संसदीय बोर्डच घेणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तर फडणवीस यांच्या या विधानावर मंत्री दीपक केसरकर यांनीही सूचक विधान केले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे दोघांनी मिळून ठरवायचे आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे सांगत होते. काही ऍडजेस्टमेंट असू शकते. पहिलं तुम्ही व्हा, मी नंतर होतो, असेही होऊ शकते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हटले होते. आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो. राज्याला आश्वासक चेहरा लाभलेला आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed