• Mon. Nov 25th, 2024

    चहातून गुंगीचं औषध, झोप लागताच कोटींचे दागिने लंपास; पोलिसांनी आरोपीला शोधत उत्तर प्रदेश गाठलं अन्…

    चहातून गुंगीचं औषध, झोप लागताच कोटींचे दागिने लंपास; पोलिसांनी आरोपीला शोधत उत्तर प्रदेश गाठलं अन्…

    धुळे : नाशिक इथून बसमध्ये बसलेल्या डिलेव्हरी बॉयकडील सोने-चांदीच्या दागिण्यांचे पार्सल अशा चोरीच्या किचकट गुन्ह्याची धुळे शहर पोलीस व एलसीबीच्या पथकाने उकल केली आहे. थेट उत्तर प्रदेशात जाऊन २ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील ४९ लाख ३६ हजार ७१५ रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली ८ लाखांची कार हस्तगत करण्यात आली. पथकाच्या कामगिरीची माहिती पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच कामगिरीचे कौतुक करीत पथकाला १० हजारांचे रिवार्ड जाहीर केले.

    जय बजरंग कुरिअरचा डिलेव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह सिकरवार हा दि. १४ जून रोजी पहाटे ५.३० वाजता नाशिक येथून धुळे इथे सोने चांदीचे दागिण्यांचे पार्सल घेऊन आला. दरम्यान त्याला बसमध्ये झोप लागल्याने अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांच्या पार्सलची बॅग चोरून नेली. त्यात ६४ लाख ८० हजार २५३ रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने होते. याबाबत विष्णुसिंह निनुआ सिकरवार (रा.काळबादेवी, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींवर धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

    Monsoon 2023 : रखडलेला मान्सून जोरदार पण तरीही शास्त्रज्ञ चिंतेत; हवामान खात्याने पावसासंबंधी दिले मोठे अपडेट्स
    या घटनेच्या तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ विजय शिरसाठ, पोना कुंदन पटाईत, पोका महेश मोरे, मनिष सोनगीरे यांनी नाशिक, धुळे या ठिकाणाचे फुटेज, तांत्रिक तपासणी करुन, गुन्ह्यात मनोज कुमार राजेंद्रसिंग सिसोदीया (रा. आग्रा, उत्तर प्रदेश), मयंक कुमार आनंदकुमार गुप्ता (रा. फिरोजाबाद उत्तरप्रदेश), पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपुत (रा.धोलपुर राजस्थान) व राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया (रा.आग्रा, उत्तरप्रदेश) यांची नांवे निष्पन्न केली.

    या आरोपींच्या शोधासाठी एलसीबीब व धुळे शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्तीक पथकाने उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यात जाऊन आरोपींचा कसून शोध घेतला. चौघांपैकी एकाला याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने व २ किलो ४०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांची किंमत एकूण ४९ लाख ३६ हजार ७१५ रूपये इतकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ८ लाखांची कार (क्र.यु. पी. ८३.ए.यु. ९३३०) असा एकूण ५७ लाख ३६ हजार ७१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याच्या तपासात राहुल सिसोदिया याने कुरीयर बॉय गोविंद सिकरवार यास चहामध्ये गुंगीचे औषध पाजल्याने तो बसमध्ये झोपल्याचे निष्पन्न झालं आहे.

    Ambenali Ghat : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद, दरड कोसळल्याने या मार्गाने वाहतूक वळवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed