• Mon. Nov 25th, 2024

    एक एकर शेतीसाठी धाकट्याला संपवण्याचा प्रयत्न, मोठ्या भावासह तिघांना जन्मेठेची शिक्षा

    एक एकर शेतीसाठी धाकट्याला संपवण्याचा प्रयत्न, मोठ्या भावासह तिघांना जन्मेठेची शिक्षा

    जळगाव : पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे शेतीच्या वादातून भावावरच त्याच्या भावासह मित्रांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने ३ संशयितांना जन्मठेप आणि प्रत्येकी १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.

    कळमसरा येथील रहिवासी दिलीप दत्तू डांबरे यांनी त्यांचे वडील दत्तु तुकाराम डांबरे यांच्याकडून ४ एकरपैकी ३ एकर शेती खरेदी केली आहे. तर एक एकर शेती यामध्ये दिलीप डांबरे यांच्याबरोबरच त्यांचा लहान भाऊ सुनील, बहिण रेखाबाई तसेच मोठा संजय यांचा हिस्सा आहे. सदरचे १ एकर शेती संजय डांबरे यांच्यावर नावावर करून द्यावी, यावरून संजय याचा दिलीप याच्यासोबत वाद होता. या वादातून संजय याने त्याचा शालक बापू मधुकर बागुल व मित्र उमेश मधुकर बागुल तसेच विजय सुरसिंग राजपूत यांना सोबत घेत दिलीप याच्या शेतात गेले. आणि लाकडाने दिलीप याला करत मारहाण करत सुनील डांबरे, बहिण रेखाबाई तसेच वहिणी यानी शिवीगाळ केली होती. या मारहाणीत सुनील यास दुखापत होवून त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. तर वैशाली व रेखाबाईही या मारहाणीत जखमी झाल्या होत्या. यावेळी संजयसह त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी दिलीप याला केलेल्या बेदम मारहाणीत त्यांच्या हाताचे हाड मोडले होते.
    Maharashtra News : महाराष्ट्राच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, महिन्यापूर्वीच कुटुंबाची अखेरची भेट; पत्नी,२ मुलं…
    याप्रकरणी जखमी दिलीप यांची पत्नी वैशाली डांबरे यांच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात ४ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयात या खटल्यावर कामकाज सुरू झाले होते. यादरम्यान खटला सुरू असताना आरोपी बापू मधुकर बागुल याचा मृत्यू झाला होता.
    मुलीचा दाखला काढण्यासाठी महिला शाळेत; त्याच शाळेसमोर दोघींचा शेवट, मृतांची ओळख पटेना, अखेर..
    त्यानंतर तिघांविरोधातील हा खटला जळगाव जिल्हा न्यायालय डी. ए न. खडसे यांच्या न्यायालयात चालला. यात सरकारपक्षातर्फे १४ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षी व पुरावा तसेच सरकार पक्षाने केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने संशयित संजय डांबरे, उमेश मधुकर बागुल व विजय सुरसिंग राजपूत या तिघांना वेगवेगळ्या कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निलेश दयाराम चौधरी यांनी काम पाहिले. तर त्यांना पैरवी अधिकारी म्हणून देवीदास कोळी, विजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

    खानदेशवासीयांची जीवनदायिनी तापी नदीला २५० मीटर साडी अर्पण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed