• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, चांदणी चौकातील वाहतूक या काळात बंद राहणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ४८ वर ४ ते १५ जुलै दरम्यान मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. तर, मल्टी ॲक्सेल वाहनांलाठी तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Pune Chandani Chowk : पुण्याच्या चांदणी चौकातील काम कधीपर्यंत पूर्ण होणार? NHAI ने सांगितली डेडलाइन

चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सब स्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चर काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त मल्टी ॲक्सेल वाहनांची वाहतूक ती तासांसाठी थांबविण्यात येणार आहे. ही वाहने योग्य त्या ठिकाणी थांबवली जातील किंवा त्या कालावधीत त्यांना इतर मार्गाचा अवलंब करवा लागणार आहे.

पुण्यातील चांदणी चौक परिसरात बस १५ फूट खाली कोसळली; ८ प्रवासी जखमी

असा असेल वाहतूक बदल

चांदणी चौकात चार जुलैपासून मध्यरात्री साडेबारापासून वाहतूक बदलास सुरुवात होणार आहे. या कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील (मेन कॅरेजवे) वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरुडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सेवा रस्ता व रॅम्प सहा चा वापर करतील. तसेच, सातारा व कोथरूड (पुणे शहर) मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प आठचा वापर करण्यात यावा. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही. त्यामुळे कुठलीही वाहतूक थांबणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक कदम यांनी दिली.

७० टनाचा रणगाडा जाईल असा पूल बांधला होता, पैसे किती उरतील हा विचार नाही केला; चांदणी चौकातल्या पुलाचे शिल्पकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed