• Sat. Sep 21st, 2024
Dharashiv : समोर आलेल्या जीपला वाचवताना ST बस उलटली, अपघातात २३ प्रवासी जखमी

धाराशिव : भूम डेपोच्या बसला मोठा अपघात झाला. या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. बार्शीहून भूमकडे येताना भांडगावच्या माळी वस्तीजवळ हा अपघात झाला.समोर आलेल्या जीपला वाचवताना भूम डेपोची एसटी बस उलटली. यामुळे झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झालेत. ही घटना सोमवारी दुपारी भांडगावच्या माळी वस्तीजवळ घडली. जखमींना उपचारासाठी भूमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे चालक दळवी हे कीरकोळ जखमी झाले आहेत.
तंदुर रोटी वेळेत का दिली नाही? तरुणाचे वेटरवर सपासप वार, ढाब्यावर घडली हत्येची थरारक घटना
या बाबत अधिक माहिती समोर आली आहे. भूम अगाराची बस बार्शीहून भूमकडे जात असताना क्रुजर जीप बसच्या समोर आली. जीपला वाचविण्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खाली गेल्याने ती उलटली. या अपघातामध्ये २३ प्रवासी जखमी झाले. बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते.
…तर माझ्यासोबत चल, भररस्त्यात पोलीस पाटलाने काढली महिलेची छेड
अपघात घडताच जवळ असलेल्या नागरीकांनी धाव घेतली. एसटीच्या मागील काच फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघात स्थळी अगार प्रमुख बी. एल.. लांडगे यांनी भेट देऊन पाहणी केली.

तुळजा भवानी मंदिरात पत्रकारांना खाजगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की

सर्व जखमींना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी आगाराकडून जखमींना ५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख बी. एल. लांडगे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed