• Sat. Sep 21st, 2024
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पहिला टप्पा कधी सुरु होणार, पाच महिने महत्त्वाचे, नवी अपडेट समोर

Mumbai Metro : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्यामध्ये काही अडचणी आहेत. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे.

 

Mumbai Metro 3
मुंबई मेट्रो ३
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पासाठी काही दिवसांपूर्वीच आलेल्या दोन गाड्यांसह वर्षभरात पाच गाड्या मुंबईत पोहोचल्या आहेत. मात्र पहिल्या टप्प्यातील मार्गिका सुरू होण्यासाठी सर्व नऊ गाड्या जूनपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. त्या अद्याप न पोहोचल्याने आता पुढील पाच महिन्यांत चार गाड्या आणाव्या लागणार आहे. प्रस्तावित नियोजनानुसार, डिसेंबरपर्यंत ही मार्गिका सुरू होण्यासाठी तपासण्या व अन्य तांत्रिक बाबी पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही मार्गिका सुरू करण्यासाठी वेगाने काम करण्याचे मोठे आव्हान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसमोर पुढील काळात असेल.मेट्रो ३ ही आरे ते कफ परेड अशी ३३ किमी लांबीची मार्गिका आहे. त्यावर एकूण २७ स्थानके आहेत. त्यापैकी दहा स्थानकांचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, हा प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पहिला टप्पा सुरू होण्यासाठी नऊ मेट्रोगाड्यांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत पाच गाड्या ही मार्गिका उभी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ताब्यात आल्या आहेत. ‘चौथ्या आणि पाचव्या गाड्यांचे डबे अलीकडेच आरे कारशेड सुविधा केंद्रात दाखल झाले. त्या डब्यांची आता जुळणी सुरू झाली आहे. त्यानंतर चाचण्या घेतल्या जातील. मात्र पहिला टप्पाची मार्गिका सुरू करण्यासाठी आणखी चार गाड्यांची आवश्यकता असेल,’ अशी माहिती ‘एमएमआरसी’ने दिली आहे.
Mumbai Costal Road: कोस्टल रोडचं काम रखडलंं, खर्चात तब्बल २२६ कोटी रुपयांची वाढ, वाढीव खर्चाचा भार मुंबईकरांवर
एमएमआरसीने या मार्गिकेसाठी ‘अल्स्टॉम’ फ्रेंच कंपनीला ३१ गाड्यांचे कंत्राट दिले आहे. प्रत्येक गाडी आठ डब्यांची आहे. त्यांची बांधणी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे होत आहे. याअंतर्गत पहिली गाडी जून, २०२२मध्ये एमएमआरसीच्या ताब्यात आली होती. पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू करणे अपेक्षित असताना गाड्यांचे डबे येऊन त्यांची जुळणी करून व चाचण्या घेणे हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. मात्र पुढील चार गाड्या मिळण्यासाठी जेमतेम पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
धोनी विमानात Candy Crush खेळताना एअर हॉस्टेसने दिली चिठ्ठी, पुढे काय घडलं Video पाहा

वळणदार रूळ उभारणीमुळे विलंब

आत्तापर्यंतच्या गाड्या बहुचर्चित आरे कारशेडमध्ये आल्या आहेत. तेथेच त्यांची जुळणी होऊन चाचणी होणार आहे. ज्या ठिकाणी चाचणी होणार आहे, तिथे वळणावर रूळ टाकावे लागणार होते. त्यासाठी ११४ झाडे तोडावी लागणार होती. झाडकापणी परवानगी संबंधी विलंब झाल्याने रूळ उभारणीला वेळ लागला. परिणामी गाड्या वेळेत दाखल होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या गाड्या दाखल झाल्याने आरे कारशेडच्या कामास विलंब असला तरीही ते काम प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट होत आहे. ही कारशेड आत्तापर्यंत ६५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहे.
Weather Forecast: राज्यासह देशात मान्सूनची जोरदार एन्ट्री, मुंबई-दिल्लीत ६२ वर्षात जे झालं नाही ते घडलं

पृथ्वीराज चव्हाणांनी उद्घाटन केलं, ११ किमी मेट्रोला १२ वर्ष लागले, फडणवीसांनी झटक्यात विषय संपवला

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed