• Sat. Sep 21st, 2024

Mumbai News: जुहूच्या समुद्रात बुडणाऱ्या मुलांना पोलिस कॅान्स्टेबलने वाचवलं, VIDEO व्हायरल

Mumbai News: जुहूच्या समुद्रात बुडणाऱ्या मुलांना पोलिस कॅान्स्टेबलने वाचवलं, VIDEO व्हायरल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: जुहू कोळीवाडा लॅण्डिंग पॉइंट येथील समुद्रात बुडणाऱ्या दोघांना या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने वाचविले. समीर पवार (१०) आणि भीम काळे (७) अशी या दोघांची नावे आहे. पोलिस कॅान्स्टेबल विष्णू भाऊराव बेले यांनी जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवले.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विष्णू बेले समुद्रात जाताना दिसत आहेत. त्यांनी किनाऱ्यापासून काही अंतर आतमध्ये जात लहान मुलांना वेळीच बाहेर काढले.

Monsoon 2023 : आनंदवार्ता, मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, देशभर जोरदार मुसंडी, आयएमडीकडून गुड न्यूज

सांताक्रूझ पश्चिमेला जुहू कोळीवाडा लॅण्डिंग पॉइंट असून येथील समद्रात शुक्रवारी सायंकाळी समीर आणि भीम हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्याने दोघेही बुडू लागले. हे पाहून पोलिस कॉन्स्टेबल बेले हे पाण्यात उतरले. पोहत जाऊन त्यांनी दोघांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. यानंतर दोन्ही मुलांना त्यांचा पत्ता विचारण्यात आला. सुरुवातीला मुलांनी घरी कळेल या भीतीने चुकीचा पत्ता सांगितला. पोलिसांनी बरीच चौकशी केल्यानंतर या मुलांनी घराचा खरा पत्ता सांगितला आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. दोन्ही मुलांवर प्रथमोपचार करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही दोन्ही मुले गोवंडीला राहणारी आहेत. घरच्यांना न सांगताच ही मुले जुहू समुद्रकिनाऱ्यावर आली होती.

Mumbai News: काम करताना मॅनहोलमध्ये पडले, मुंबईत दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, दोष कुणाचा?

समीर पवार (वय १०) आणि भीम काळे (वय ७) ही दोन मुले जुहू बीचच्या जुहू कोळीवाडा लँडिंग पॉईंटच्या टोकावरून समुद्रात उतरली. काही वेळातच ही दोन्ही मुले समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकली, त्यामुळे त्यांना पोहता आले नाही. समुद्रकिनारी तैनात असलेले पोलिस हवालदार विष्णू भाऊराव बेले यांना दोघे समुद्रात बुडताना दिसताक्षणी समुद्रात उडी घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार बेले यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; सुदैवाने बचावले पर्यटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed