त्यानंतर तातडीने ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बोरगाव गाठून पाहाणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रवाना करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यावर विविध विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याचे निर्देश अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांनी आर्णी पोलिसांना दिले. त्यानंतर तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.या पथकांद्वारे मारेकऱ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली.अश्यात गावातील सुनील जाधव हा घटनेपासून गावात नसल्याची बाब समोर आली.
त्यानंतर बोरगाव परिसरातील संपूर्ण जंगल परिसर पोलिसांनी पिंजून काढला. दरम्यान शनिवारी सुनील जाधव हा पांगरी-दाभडी जंगल परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून दाभडी जंगल परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. गुरूवारी सुनील जाधव हा दारूच्या नशेत त्या महिलेच्या घरात शिरला होता. दरम्यान त्याने महिलेला शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता, रागाच्या भरात त्याने धारदार चाकुने महिलेवर वार करीत तिची हत्या केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. पाटील, पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, गजानन अजमिरे, पथकातील विजय चव्हाण, समिश चौधार, अरविंद जाधव, मनोज चव्हाण, अशोक टेकाळे, विशाल गावंडे, अतुल पवार, संदिप ढेंगे, आकाश गावंडे, अरविंद चेमटे यांनी पार पाडली.