• Sat. Sep 21st, 2024
रेल्वेच्या ‘अहिल्ये’ची कोटींची कमाई; तिकीट तपासनीस महिलांची विशेष कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागातील तिकीट तपासनीसांच्या (टीसी) ‘अहिल्या पथका’तील महिलेने गेल्या आर्थिक वर्षात ९७ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. पुणे विभागात महिला तिकीट तपासनीसाने मिळवून दिलेले हे सर्वाधिक उत्पन्न आहे.एम. पी. चाकणे असे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या तिकीट तपासनीस महिलेचे नाव आहे. त्या पुणे रेल्वे विभागात टीसीच्या भरारी पथकात काम करतात. त्यांनी गेल्या वर्षात २९० दिवस काम केले होते. पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वेतील विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम भरारी पथकाकडून केले जाते. या पथकात चाकणेंसोबत रुपाली माळवे, रुपाली नाशिककर काम करतात. गेल्या आर्थिक वर्षात या तिघींनी रेल्वेला दोन कोटी आठ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यामध्ये चाकणे यांचा वाटा ९७ लाख ५५ हजारांचा आहे.

Pune News : पुण्यातील परिचारिका बहिणींचा सन्मान; चार दशकांपासून जवानांची सेवा करणाऱ्या हातांचा गौरव
पुणे रेल्वे विभागात एकूण ३२ महिला टीसी आहेत. त्यापैकी तीन महिला भरारी पथकात, नऊ महिला उपनगरात धावणाऱ्या लोकल टीसीचे काम करतात. तर, काही प्रवासी चार्ट घेऊन कोचनुसार तपासणीचे काम करतात. पूर्वी १२ महिला टीसी केवळ उपनगरात धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट तपासनीसांचे काम करीत होत्या.

पुणे रेल्वे विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्पन्न कसे वाढविता येईल, अशी विचारणा त्यांनी महिला तिकीट तपासनीसांना केली होती. ‘उपनगरात धावणाऱ्या गाड्यांमध्ये टीसीचे काम करीत असल्याने उत्पन्न कमी आहे. सर्व गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यास मोकळीस दिल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल,’ असे त्यांनी सांगितले. त्यानुसार चाकणे व इतर दोघींचे भरारी पथक तयार करून त्यांना सर्व रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले.

पुणे लोकलमध्ये तिकीट तपासनीसांचे काम करणाऱ्यांना महिलांचे उत्पन्न कमी होते. त्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी विचारणा केली. त्यांच्या मनाप्रमाणे भरारी पथक तयार करून सर्व रेल्वे गाड्यांमध्ये तपासणीचे काम दिले. त्यामुळे या पथकातील महिला तिकीट तपासनीसांनी आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. येत्या वर्षात एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

– डॉ. रामदास भिसे, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग

प्रवाशांच्या जीवाशी खेळ; असुरक्षित पीएमपी बसला फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचा ‘आप’चा दावा
कोयना एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनीस

पुणे रेल्वे विभागाने कोयना एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी करण्याची जबाबदारी महिला टीसीकडे दिली आहे. सध्या प्रवासी चार्ट घेऊन सहा महिला टीसी या रेल्वेत काम करीत आहेत. त्यासाठी सहा तिकीट तपासनीसांची कोल्हापूर येथे सोय करण्यात आली आहे. महिला टीसींमुळे रेल्वे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed