ऑनलाइन भरणा २२५ कोटी
महापालिकेने मालमत्ताकरामध्ये आगाऊ कर भरल्यास पाच टक्के व ऑनलाइन कराचा भरणा केल्यास पाच टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. करदात्यांनी मोठ्या प्रमाणात या सवलतींचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन स्वरूपात तब्बल १२५ कोटींचा भरणा झाला असून, पेपरलेस व डिजिटल इंडिया अभियानास या उपक्रमाद्वारे चालना मिळाली आहे.
३०० कोटी करसंकलनास लागलेले दिवस
आर्थिक वर्ष – दिवस
२०१९-२० – १३८ दिवस
२०२०-२१ – २७४ दिवस
२०२१-२२ – २१७ दिवस
२०२२-२३ – १३७ दिवस
२०२३-२४ – ८२ दिवस
असे झाले करसंकलन
ऑनलाइन/बीबीपीएस : २१८ कोटी
रोख स्वरूपत : ३९ कोटी
चेक/डीडी : २६ कोटी
इतर : २० कोटी
गेल्या वर्षीची जप्ती कारवाई, प्रकल्पसिद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे या वर्षी करसंकलनात पालिकेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. ही आघाडी वर्षभर कायम राहील, अशी दक्षता घेण्याचा आदेश दिला आहे. आता होऊ घातलेल्या मालमत्ता सर्वेक्षणातून महापालिकेची करप्रणाली अत्यंत पारदर्शी, लोकाभिमुख आणि समन्यायी ठरेल.
– शेखरसिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगपालिका
एक एप्रिल ते ३० जून हे सर्वाधिक कर भरण्याचे दिवस म्हणजे एक प्रकारे ‘पॉवर प्ले’ असतो. पण यात विभागापेक्षा कर्तव्यदक्ष, जागरूक जबाबदार करदाते यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेने राबवलेला जनजागृती उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याला या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले आहे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग