• Fri. Mar 13th, 2026
    स्टेटसवर म्हणाला ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’, मित्र घराकडे धावेपर्यंत तरूणाने सगळं संपवलं…

    सातारा : मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर मजकूर टाकून युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना करपेवाडी (ता.पाटण) इथे काल रात्री घडली. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय २२) असं या युवकाचं नाव आहे. मोबाईलवरील स्टेटस पाहताच काही जणांनी तातडीने स्वप्नीलच्या घरी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.याबाबत मिळालेली माहिती अशी की, करपेवाडी इथला स्वप्नील करपे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. त्याचे वडील व मोठे बंधू कामानिमित्ताने मुंबईला असतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले असून, काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी मुंबईला गेली आहे. रात्री घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईलवर स्वतःचा फोटो तसेच त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली व इतर मजकूर लिहिलेला स्टेटस ठेवला.

    Monsoon Update : मुंबई, पुण्यात मान्सून आणखी लांबला, हवामान खात्याने दिली नवी तारीख; येलो अलर्टही जारी
    “लवकरच या फोटोला हार चढणार आहे, शब्द आहे आपला. खूप केलं माणसांसाठी आता बस्स, नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय या फोटोला हार चढला तर मला….. बंटी करपे आपणास भावपूर्ण श्रद्धांजली” असा मजकूर त्याच्या स्टेटसला बघितल्यावर काही जणांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. खोलीचा दरवाजा बंद असल्याने व आतून हाकेला प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांनी खिडकीतून खात्री केल्यावर त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

    याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज सकाळी करपेवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निल मनमिळावू स्वभावाचा होता. बंटी नावाने तो परिचित होता. त्याच्या मागे पत्नी, आई – वडील, भाऊ असा परिवार आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

    फेसबुक लाईव्हमध्येच सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचा गळफास, शेवटच्या क्षणाला सांगितलं भयंकर सत्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed