इंदापूर, पुणे : पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला श्रीगोंदा येथून पायी वारीत निघालेल्या वारकऱ्याला पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण मार्तंड रोडे (वय ७५ व रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे.याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये लक्ष्मण रोडे यांचे जावई कल्याण गुलाब घुटे (वय ४६ वर्ष रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात १८ चार्जिंग स्टेशन सुरू; परवडणाऱ्या दरांमुळे चालकांकडून महावितरण च्या केंद्रांना पसंती
याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली. बुधवारी रात्रीपासून श्रीगोंदा तालुक्यातील पायी दिंडी वारी सकुंडे वस्तीजवळ मुक्कामी होती. या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी लक्ष्मण रोडे हे पुढील पायीवरीला मार्गस्थ होण्यापूर्वी आज पहाटे प्रातः विधीसाठी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सोलापूर बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रोडे यांना जोरदार धडक दिली. या जोराच्या धडकेत लक्ष्मण रोडे यांच्या डोक्यास तसेच उजव्या पायास गंभीर झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.शंखांचा निनाद अन् विठु नामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. सदर अपघाताचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोकरे हे करत आहेत.