• Sat. Sep 21st, 2024

चंद्रपूरच्या पुष्पा पोडेंना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जाहीर

चंद्रपूरच्या पुष्पा पोडेंना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जाहीर

The Highest Award In The Field Of Nursing : चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला असून, आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोडे यांना हा पुरस्कार प्रदान करतील.

 

pushpa
चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जाहीर
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : चंद्रपूर येथील शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील अध्यापिका पुष्पा श्रावण पोडे यांना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्सिंग क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आज, गुरुवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोडे यांना हा पुरस्कार प्रदान करतील.चंद्रपूर जिल्ह्यातील कळमना येथे जन्‍मलेल्या पुष्पा पोडे (पाचभाई) या २००१पासून नर्सिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून पोडे यांनी कामाला सुरुवात केली. त्‍यानंतर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाली. रूग्‍णसेवा करीत असतानाच पोडे यांनी बी. एससी. नर्सिंग आणि एम. एससी. नर्सिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्‍या शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.
शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी; नातेवाईक बनून साधलेला डाव, पण…
करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पोडे यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. त्‍यांच्या या कार्याची दखल घेत ‘नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया’ने पोडे (पाचभाई) यांची फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारासाठी निवड केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed