• Mon. Nov 25th, 2024

    शेतीवरुन झालेला वाद पोहोचला शिगेला; कुटुंबाने पोटचा मुलगा गमावला, वाचा नेमकं प्रकरण

    शेतीवरुन झालेला वाद पोहोचला शिगेला; कुटुंबाने पोटचा मुलगा गमावला, वाचा नेमकं प्रकरण

    यवतमाळ: शेतीतील कर्जाच्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना २० जूनला सकाळच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे घडली आहे. संतोष तुळशिराम देवारे (३५) असे मृत युवकाचे नाव आहे. दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील संतोष देवारे यांचे वडील तुळशीराम देवारे यांनी वसंतराव दुधे यांच्या जवळून काही वर्षापूर्वी शेत विकत घेतले होते.
    मामाची साथ अन् पुतण्या जीवावर उठला; क्षुल्लक कारणावरून निर्घृणपणे काकीची हत्या
    मात्र संतोष याचे वडील जेव्हा बॅकेमध्ये गेले, त्यावेळी त्यांच्या सात बाऱ्यावर ७० हजार ५०० रुपयाचे कर्ज असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांने सांगितले. तसेच त्यांना सातबार्‍यावर कर्ज मिळू शकत नाही, असेही सांगितले. त्यामुळे तुळशीराम देवारे यांनी वसंता दुधे आणि आकाश यांना विचारपुस करीत सातबाऱ्यावर तर ७० हजार ५०० रुपयांचा कर्जाचा बोजा दाखवत असल्याचे सांगितले. यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. सोमवारी ही बाब वडील तुळशीराम यांनी मुलगा संतोष याला सांगितली.

    दरम्यान सायंकाळी आकाश दुधे, वसंता दुधे आणि आकशची आई यांच्यासोबत संतोष आणि त्याचे वडील तुळशीराम देवारे यांच्यात वाद झाला होता. तसेच मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी वसंतराव दुधे यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तुळशीराम देवारे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच संतोष घरी परत आला नव्हता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी आकाश दुधे यांच्या घरात संतोष हा रक्ताच्या थारोळ्यात आई राधाबाई देवारे आणि भाऊ दत्ता यांना दिसून आला.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    या प्रकरणी भाऊ दत्ता तुळशीराम देवारे (३२) यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, सोमवारी सायंकाळी आमचे कुटुंब आणि आकाश दुधे आणि वसंता दुधे यांच्यामध्ये शेतीवर कर्ज असल्याबाबत शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर संतोष हा रात्रभर परत घरी आलाच नाही. ईकडे तिकडे शोधाशोध करूनही दिसून आला नाही. म्हणून मंगळवारी सकाळीच संतोष याची आई आकाश दुधे यांच्या घरी गेली असता, त्यांच्या घरात संतोष याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी लाडखेड पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed