• Mon. Nov 25th, 2024
    Darshana Pawar: दर्शनाची सुरु होणार होती नवी इनिंग, क्षणात स्वप्न भंगलं; पाहा MPSC टॉपरचा रिझल्ट

    पुणे : सर्वसामान्य कुटुंबातील दर्शना पवार हिने अतिशय कष्टाने अभ्यास करून एमपीएसीतील वनाधिकारी परीक्षा पास होऊन ती राज्यात तिसरी आली होती. काही दिवसातच ती अधिकारी आणि तिला अधिकारही मिळणार होते. तिच्या नव्या इनिंगची सुरुवात होणार होती. मात्र, निकाल लागल्याच्या काही दिवसातच तिचे सर्व स्वप्न संपली. दर्शनाची हत्या होऊन तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला. तिच्या शरीरावर आणि डोक्यावर असणाऱ्या जखमांमधून तिच्या हत्येची दाहकता जाणवत होती. सहा दिवसानंतर तिचा मृतदेह आढळला. अंगावर शहारे आणणारी ही घटना सर्वांनाच चटका लावणारी आहे.

    दर्शना पवार ही अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील. सर्व सामान्य कुटुंबातील ही मुलगी, शाळेत देखील हुशार होती. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्याने ती एमपीएसी परीक्षेत टॉप आली होती. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुकही झाले होते. मात्र, १२ जून रोजी दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह ती राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली. दोघेही दुचाकीवरुन तिथे गेले. सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याची माहिती समोर आली. या घटनेपासून राहुल हांडोरे हा गायब आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

    पुणे दर्शना पवार हत्या प्रकरण

    Pune Crime: MPSC टॉपर हत्या प्रकरणात राजगडावर सापडला मोठा पुरावा, आता पोलिसांना हवाय फक्त राहुल हांडोरे
    मात्र, राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंगला गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

    Pune Crime : दर्शना पवारसोबत राजगडावर गेलेला मित्र नेमका कुठे? एटीएम कार्ड आणि लास्ट कॉल लोकेशन सापडलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *