• Mon. Nov 25th, 2024

    आमदार गीता जैन यांनी अभियंत्याचा शर्ट खेचला, कानशिलातही लगावली; नेमकं काय घडलं?

    आमदार गीता जैन यांनी अभियंत्याचा शर्ट खेचला, कानशिलातही लगावली; नेमकं काय घडलं?

    MLA Geeta Jain Slaps Engineer : आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गीता जैन यांनी मिरा-भाईंदर पालिकेच्या एका कंत्राटी अभियंत्याला कानशिलात लगावली.

     

    महापालिका अभियंत्याला आमदार गीता जैन यांनी काशिलात लगावली
    भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेच्या एका कंत्राटी अभियंत्याला आमदार गीता जैन यांनी मंगळवारी मारहाण केली आहे. पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश नसतानाही ती करण्यात आली. ह्याचा जाब विचारत असताना अभियंता बेजबाबदार पद्धतीने हसल्याने जैन यांनी रागातून ही मारहाण केली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गीता जैन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीडित कुटुंबाला घरातून बेघर केलं आणि अभियंता हसत होता. हा प्रकार अजिबात सहन होणारा नाही. यामुळे आपण त्याच्या कानाखाली लगावली. याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे, असे गीता जैन म्हणाल्या.मिरा रोडच्या पेणकर येथील कक्कड इमारती लगत असणाऱ्या जागेतील एका झोपड्यावर १६ जून रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून तोडक कारवाई करण्यात आली. विनवण्या केल्यानंतरही भर पावसात लहान मुलांना आणि गर्भवती महिलेला बळजबरीने घरातून बाहेरकडून पथकाकडून कारवाई करण्यात आल्याची तक्रार आमदार गीता जैन यांच्याकडे पीडित गरीब कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यावरून मंगळवारी दुपारी जैन या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या.
    दिव्यामध्ये नव्याकोऱ्या रस्त्याचे खोदकाम; भाजप,मनसे कडून प्रशासनावर टीका
    यावेळी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून जैन यांनी शासनाचे पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश असताना पालिकेमार्फत कारवाई का करण्यात आली? असा सवाल केला. आणि हा मुद्दा आपण विधिमंडळात उपस्थित करणार, असे त्यांनी सांगितले. आपण आता का काही बोलत नाही? असा सवाल त्यांनी मनपाचे अभियंता शुभम पाटील व इतर कर्मचाऱ्यांना केला. त्यावर पाटील बेजबाबदार रित्या हसू लागल्याने जैन यांना राग अनावर झाला. त्यांनी अभियंता पाटील यांच्या कानशिलात लगावली. हे कुटुंब अधिकृतरित्या वास्तव्य करत असतानाही कारवाई करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबाच्या घराचा काही भाग हा एका विकासाच्या जागेत येत असल्याने त्याला त्याचा अडथळा ठरत होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

    नालेसफाईवरून आमदार गणपत गायकवाड संतापले, अधिकाऱ्यांना रस्त्यातच झापलं

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *