• Sat. Sep 21st, 2024

येरवडा तुरुंगात वर्चस्वाच्या वादातून कैद्यांमध्ये राडा, दोन गटात तुफान हाणामारी, अनेक जखमी

येरवडा तुरुंगात वर्चस्वाच्या वादातून कैद्यांमध्ये राडा, दोन गटात तुफान हाणामारी, अनेक जखमी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये अनेक कैदी जखमी झाले आहेत. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकाश येवले, प्रणव रणधीर, विजय वीरकर, सचिन दळवी, मुकेश साळुंखे, श्री वाघमारे, आदित्य चौधरी, किरण गालफाडे, आकाश शिनगारे, विशाल खरात, रुपेश आखाडे, रोहित जुजगर, शुभम राठोड, अनराग कांबळे, मेहबूब शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांनी या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक तीन आणि बराक क्रमांक आठमधील कैद्यांमध्ये झालेल्या वादातून ही हाणामारी झाली. कैद्यांनी दगड आणि पत्र्याने एकमेकावर वार केले. कारागृहातील बराकीत वर्चस्वाच्या वादातून हाणामारीची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.
दौंड तालुका हादरला…डॉक्टरची पत्नी मुलांसह आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत
कुख्यात गज्या मारणे टोळीतील गुंडांचा येरवडा कारागृहात गोंधळ

येवरडा कारागृहात यापूर्वीही वर्चस्वाच्या वादातून घटना घडल्या आहेत. गेल्या महन्यात अशीच एक घटना येरवडा कारागृहात आधी घडली होती. यात कॅरम खेळण्याच्या वादातून कुख्यात गज्या मारणे टोळीतील गुंडांनी येरवडा कारागृहात गोंधळ घातला होता. गुंडांच्या हल्ल्यात एकाच्या डोक्यात पाट घातल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काटेवाडीतलं मेंढ्यांचे गोल रिंगण, पालखी सोहळ्यातील डोळ्यांचं पारणं फेडणारे दृश्य!

येरवडा कारागृहात वेगवेगळ्या बराकीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केलेले वेगवेगळ्या टोळीतील ७०० ते ८०० गुंड आहेत. मारणे टोळी आणि इतर गुंडांमध्ये कॅरम खेळण्यावरून वाद झाला होता. त्या वेळी कारागृहातील रक्षकांनी भांडणे सोडवली होती. त्यानंतर सर्वांना बराकीत बंद करण्यात आले होते. रात्री तपासणी सुरू असताना गुंडांच्या टोळीत पुन्हा वाद उफाळून आला. या वेळी एकाने दुसऱ्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. कारागृह रक्षकांनी भांडणे सोडवून पुन्हा सर्व गुंडांची वेगवेगळ्या बराकीत रवानगी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed