• Sat. Sep 21st, 2024
मुंबईतला प्रकार वाचून हादराल; १७ हजारात केलं खास फेशिअल, थोड्याच वेळात गाठलं पोलीस स्टेशन

मुंबई : मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एक महिला चेहऱ्याच्या मसाजसाठी ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlor) गेली होती. तिने चेहऱ्यासाठी तब्बल १७,५०० रुपयांची हायड्राफेशियल ट्रीटमेंट (HydraFacial treatment) घेतली. पण यानंतर असं काही घडलं की सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मसाज (Facial Massage) केल्याच्या काही वेळानंतरच महिलेला त्रास झाला आणि तिने थेट दवाखाना गाठला.मिळालेल्या माहितीनुसार, मसाज केल्याच्या काही वेळाने महिलेची त्वचा जळू लागली. महिलेने डॉक्टरांना दाखवले असता चेहऱ्याच्या मसाजमुळे त्वचेला कायमचे नुकसान झाल्याचे आढळून आले. यानंतर पीडित महिलेने ब्युटी सलूनविरोधात एफआयआर दाखल केली आहे. ही घटना १७ जूनची आहे. या महिलेने कामधेनू शॉपिंग सेंटरमधील ग्लो लक्स सलूनमध्ये हा चेहऱ्याचा मसाज करून घेतला होता.

Pune Crime: MPSC टॉपर हत्या प्रकरणात राजगडावर सापडला मोठा पुरावा, आता पोलिसांना हवाय फक्त राहुल हांडोरे

कायमची खराब झाली त्वचा…

ब्युटी सलूनमध्ये चेहऱ्याचा मसाज केल्यानंतर महिलेला अचानक तिच्या त्वचेवर जळजळ जाणवली. तिची फार चिडचिड वाढू लागल्याने महिलेने तातडीने त्वचा तज्ज्ञांना दाखवलं. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, फेशियल ट्रिटमेंटमुळे त्वचेला कायमचं नुकसान झालं आहे. डॉक्टरांनी महिलेच्या त्वचेची जळजळ आणि त्वचेचे नुकसान यावर उपचार केलं. त्यानंतर महिलेने मनसेचे स्थानिक नगरसेवक प्रशांत राणे यांच्या मदतीने सलूनविरोधात एफआयआर दाखल केला.

Weather Alert : राज्यात पुढचे ५ दिवस ऊन-पावसाचा खेळ, मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांमध्ये सूर्य कोपणार
या भयानक घटनेबद्दल राणे यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती, जी नंतर काढून टाकण्यात आली. ट्विटमध्ये त्यांनी लिहलं होतं की, ‘अंधेरी लोखंडवाला मार्केट कामधेनू शॉपिंग सेंटरमधील ग्लो लक्स सलूनमध्ये एक महिला फेशियल करण्यासाठी गेली होती. निकृष्ट उत्पादने आणि तंत्र वापरल्यामुळे त्वचा जळली.

Maharashtra Cath Lab: एक नंबर! महाराष्ट्र सरकारने वाढत्या हार्ट अ‍टॅकवर काढला उपाय, योजना वाचून तुम्हीही कराल कौतूक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed