• Mon. Nov 25th, 2024

    Pune Crime News: पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, धक्कादायक कारण पुढे

    Pune Crime News: पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, धक्कादायक कारण पुढे

    पुणे: शुक्रवार पेठेतील पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ पोलिस तपासात उलगडले आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत पतीवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरातील एका सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली होती. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. मात्र, पत्नीचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट नव्हते. मानसिक त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

    सुनीता थोरात (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) असे मृत पुरुषाचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडक पोलिस ठाण्यात मृत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    थोरात सहकारी बँकेतून निवृत्त झाले होते. त्यांनी रविवारी सकाळी मित्राला घरी बोलविले होते. दरवाजा उघडा नसल्याने त्यांना संशय आला. थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुनीता कॉटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

    प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

    सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सुनीता गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होत्या. पोलिस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed