• Mon. Nov 25th, 2024
    तुळजा भवानीला भाविकांकडून भरभरून दान, तब्बल १३ वर्षांनी होतयं मोजदात

    धाराशीव: कुलस्वामिनी तुळजा भवानी हि कुलदैवत असल्यामुळे दर्शनाला राज्यातील तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासह विविध राज्यातून भाविक येत असतात. कुलाचार केल्यानंतर देवीला सोने, चांदी, मौल्यवान अलंकार भेट देत असतात. २००९ पासुन आजपर्यंत सोने, चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदात झाली नव्हती. दरम्यान आता जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओंम्बासे यांच्या आदेशान्वये कडेकोट सुरक्षेत इन कॅमेरामध्ये सोन्याची मोजदात सुरु आहे.

    विशेष म्हणजे दान आलेले सोने, हिरे खरे आहेत कि नकली तपासणीसाठी मंदिर प्रशासनाने सोनाराची नियुक्ती केली आहे. २००९ नंतर जमा झालेल्या तुळजा भवानीच्या सोने, चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदाद ७ जुनपासुन सुरु आहे. १२ जुनपर्यंत २०७ किलो सोने ३५४ हिरे दान आले आहेत. अंदाजे ६५ कोटी रुपयाचे सोने असुन अंदाजे २० लाख रुपयांचे हिरे दान आले आहे. तर १२ जुनपासुन आजपर्यंत या ८ दिवसात विविध पेटी मध्ये असलेले २५८६ किलो चांदीची मोजणी झाली आहे.
    आधी समाजासाठी संघर्ष; आता घेणार जगविख्यात विद्यापीठात शिक्षण, बुलढाण्याच्या मेंढपाळ पुत्राची गगनभरारी
    आजचा चांदीचा दर ७३ हजार रुपये किलो असुन २५८६ किलो चांदीची किंमत अंदाजे १८ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये होते. २००९ पुर्वी वितळवलेले १३९ किलो चांदी तसेच पुर्वीची ट्रेझरीमध्ये २०० किलो चांदी जमा आहे. सिंहासन, उंबरा, २ अंबारी, चौरंग,विना वापराच्या विविध वस्तु यांची मोजदाद बाकी असुन पुढील ४ दिवस हि मोजदाद होणार आहे. २००१ ते २००५ या दरम्यान तुळजा भवानीच्या खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक सोन्या चांदीच्या वस्तु, मौल्यवान अलंकार, प्राचीन नानी, यांचा अपहार झाला होता.

    किती लोकांच्या समस्या सोडवल्या ते बोला, अजितदादांनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं

    राजे महाराजे यांनी देवीला अर्पण केलेले ऐतिहासिक पुरातन ७१ नानी, २ खडाव जोड, माणिक गायब झाले होते. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. सोने चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेत संबधित दोषींचा अपहार दडवण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असेपर्यंत दान आलेले सोने, चांदी वितळवण्यास पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदिर संस्थान डॉ. सचिन ओंम्बासे यांना निवेदनद्वारे विरोध केला आहे. सोने,चांदी वितळवल्यानंतर शुध्द सोने, शुध्द चांदी यांची किंमत तसेच वजन समजणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed